आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री फडणवीसांना मोदींपेक्षा जास्त कळते का; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक  - ‘उत्तर प्रदेशात भाजपने ३६ हजार ३०० कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. महाराष्ट्रात तर फक्त ३० हजार कोटींची गरज अाहे. पंतप्रधान मोदींची घोषणा उत्तर प्रदेशात प्रत्यक्षात येते, मग फडणवीसांना मोदींपेक्षा जास्त कळते का,’ असा प्रश्न काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. कर्जमाफी, कर्जमुक्ती हे शब्दजंजाळ आहे. सातबारा कोरा करा, हेच त्यावरचे उत्तर आहे, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशापेक्षा महाराष्ट्रात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. परिस्थिती अधिक गंभीर आहे आणि कर्जफेडीची रक्कम कमी आहे. त्यामुळे भाजपला इथेही कर्जमाफी करावीच लागेल, असे चव्हाण यांनी  ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.  
 
‘२००८ मध्ये केंद्र सरकारने कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्रात दोन वेळा दुष्काळ पडला. नोटाबंदीमुळे शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजप सरकारने इथे कर्जमाफी केली नाही तर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा चव्हाण यांनी दिला. कर्जमाफीचा फायदा बँकांना होतो ही टीकाही त्यांनी खोडून काढली. ‘बँका या जनतेच्याच आहेत, सातबारा कोरा केल्याशिवाय शेतकऱ्याला त्या नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा बँकांना होतो, शेतकऱ्याला नाही या म्हणण्यात तथ्य नाही. जनता सरकारकडे कर भरते. त्यातून आता अडचणीच्या वेळी मदत मागते आहे. तेव्हा कर्जमाफी ही सरकारची जबाबदारीच आहे. कर्जमाफी, कर्जमुक्ती हे फक्त शब्दजंजाळ आहे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे हीच सध्याची तातडीची गरज आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...