आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर राेखण्यासाठी काँक्रिटीकरण फाेडून गाेदापात्र खाेलीकरणाचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ५०० काेटी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीतील ‘प्राेजेक्ट गाेदा’ या प्रकल्पात कायमस्वरूपी पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी गाेदावरीचे क्राँक्रिटीकरण असलेल्या पात्रासहीत अन्य भागातही खाेलीकरणाचा प्रस्ताव भाजपचे नाशिक पूर्वचे अामदार बाळासाहेब सानप नाशिक मध्यच्या अामदार देवयानी फरांदे यांनी सिटिझन अॅडव्हायझरी समितीसमाेर मांडला. या समितीसमाेर खासदार, अामदारांसह सिटिझन फाेरमच्या वतीने स्मार्ट सिटीतील विविध प्रकल्पांवर सूचनांचा वर्षाव करण्यात अाला. स्मार्ट सिटी याेजनेत विविध प्रकल्पांवर सल्लामसलत वा बहुमूल्य सूचना घेण्यासाठी लाेकप्रतिनिधी तसेच शहरातील सूज्ञ नागरिकांचाही समावेश करणे बंधनकारक अाहे. 


त्यासाठी स्मार्ट सिटी सिटिझन अॅडव्हायझरी समिती स्थापन करण्यात अाली अाहे. या समितीची साेमवारी अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला खासदार हेमंत गाेडसे, अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, महापाैर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांच्यासह संचालक उपस्थित हाेते. या बैठकीत स्मार्ट सिटीतील कालिदास कलामंदिर नूतनीकरण, अशाेकस्तंभ ते त्र्यंबकराेड स्मार्ट रस्ता, प्राेजेक्ट गाेदा अशा विविध प्रकल्पांचे सादरीकरण करून त्यात काय फेरबदल अपेक्षित अाहेत याबाबत सूचना जाणून घेतल्या. त्यात प्राेजेक्ट गाेदावर चर्चा झाली. प्रामुख्याने गाेदावरी नदी कायमस्वरूपी कशी प्रदूषणमुक्त हाेईल, बांधकामामुळे पुराचे संकुचित झालेले पात्र, दरवर्षी पुराच्या पाण्याने हाेणारे नुकसान या पार्श्वभूमीवर गाेदा पात्र खाेलीकरण कसे करता येईल याबाबत नियाेजन करण्याची मागणी दाेन्ही तीरावर राहणाऱ्या अामदार सानप फरांदे यांनी केली. 


क्राँकिटीकरणालाही विराेध हाेत असल्यामुळे येथील नैसर्गिक झरेही जिवंत हाेऊन पात्रात पाणी येईल याकडे लक्ष वेधले. दरम्यान, फरांदे यांनी जुने नाशिक वा गावठाणात क्लस्टर याेजना अर्थातच गावठाण पुनर्विकास याेजना कशी राबवता येईल याबाबत नियाेजनाची मागणी केली. स्मार्ट राेड त्र्यंबकराेडएेवजी मुंबई नाक्यापर्यंत विस्तारीत करावा, अशी मागणी फरांदे यांनी केली. मात्र अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी पायलट प्राेजेक्टमध्ये तसा बदल करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र महापालिकेच्या निधीतून हा रस्ता पुढे मुंबईनाक्यापर्यंत नक्कीच विकसित केला जाईल, असेही सांगितले. खासदार गाेडसे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, प्रत्येक घरात इंटरनेट सुविधा देणे, अाॅप्टीकल केबलचे जाळे विस्तारीत करणे अादी मागण्या केल्या. 

बातम्या आणखी आहेत...