आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीविरोधात रचल्या साेनांबे गावातही चिता, 100 जणांनी शेतातील झाडांना टांगले गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेनांबे गावात चिता रचून अात्मदहनाचा इशारा देणाऱ्या महिला. - Divya Marathi
साेनांबे गावात चिता रचून अात्मदहनाचा इशारा देणाऱ्या महिला.
सिन्नर - समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी नाशिक जिल्ह्यातील शिवाडे या गावात तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी घराच्या अंगणात, शेतात चिता रचल्या हाेत्या. त्यापाठाेपाठ अाता  सोनांबेत गावाही त्याचे लोण पसरले आहे. बुधवारी साेनांबे येथेही चार शेतकऱ्यांनी व महिलांनी आपल्या शेतात चिता रचून त्यावर बसत शासनाप्रति रोष व्यक्त केला. तर सुमारे १०० शेतकऱ्यांनी शेतातील झाडांना गळफास टांगले अाहे. जीव गेला तरी बेहत्तर मात्र कुठल्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गासाठी जमीन देणार नाही, असा निर्धार यावेळी बाधित शेतकरी कुटुंबांनी केला.  
 
सोनांबे गावातून सुमारे सव्वा दोन किमीचा रस्ता जात असून, त्यात १६५ कुटुंबे बाधित होणार आहेत. त्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या बारमाही बागायती जमीन असून अनेकांची पक्की घरे आहेत. समृद्धी महामार्ग झाल्यास ही सर्व कुटुंबे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे शिवड्याप्रमाणेच साेनांबे गावातही समृद्धी महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. बुधवारी गावातील बाधित शेतकरी कुटुंबातील महिला, पुरुष आणि तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. गावालगत वस्ती असलेल्या शहाजी पवार आणि भीमा धाेंडीबा सातपुते, महादू धोंडीबा सातपुते या शेतकऱ्यांनी चिता रचून त्यावर बसून अात्मदहनाचा इशारा दिला.
बातम्या आणखी आहेत...