आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड-इंदूर रेल्वेसाठी नाशिकमधील सर्वेक्षण पूर्ण; अाता धुळ्यात काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना जाेडणाऱ्या व बहुप्रतीक्षित असलेल्या मनमाड- इंदूर या रेल्वेमार्गाच्या अंतिम भूसर्वेक्षणाचे काम पुणे येथील हायड्रोपिनिअम सिस्टिम या कंपनीतर्फे सुरू करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वेक्षणाचे काम नुकतेच संपले असून आता धुळे जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असल्याचे संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 
 
मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होणार म्हणून नागरिकांमध्ये उत्सुकता होती. रेल्वे विभागाने भूसर्वेक्षणालाही सुरुवात केली असून नाशिक जिल्ह्यातील सर्वेक्षण संपले आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीची तीन पथके हे काम करीत असून सध्या एक पथक झोडगे गावात, दुसरे पथक आर्वी शिवारात पारोळारोडवर सर्वेक्षण करीत आहे. 
 
या मार्गावरील नदीनाल्यावर बांधण्यात येणाऱ्या लहानमोठ्या पुलांची स्थान निश्चिती आणि त्यांचे डिझाइन तयार करून अंतिम अहवाल करण्यात येत आहे. कंपनीतर्फे शंभर किलोमीटर अंतराचे प्राथमिक सर्वेक्षण करून ते मध्य रेल्वेच्या निर्माण शाखेच्या मुख्य अभियंत्याकडून मंजूर करून घेतले आहे. सर्वेक्षणाचे काम विशाल डांगे, दीपक पाटील हे करीत अाहेत. संघर्ष समितीच्या सदस्यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला हाेता.   
 
दरराेज सात किलोमीटर सर्वेक्षण   
सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या तिन्ही पथकांतर्फे दीडशे फूट रुंदी ग्राह्य धरून प्रतिदिन सात किलोमीटर सर्वेक्षण करीत आहे. एक पथक दिवसभरात दीड ते दोन किलोमीटर अंतराचे सर्व्हे पूर्ण करीत अाहे. या ठिकाणी निशाणी म्हणून लाकडाच्या खुंट्याचा वापर करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...