आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, १०० मि. मी. नाेंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या रविवारी मुसळधार पावसात माेठ्या प्रमाणावर ड्रेनेज, पावसाळी नाले, गटारी तुंबल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर तरी यांची स्वच्छता केली जाईल अशी अपेक्षा असताना प्रशासनाकडून या कामांकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने दिसून आले. शनिवारी (दि. २४) झालेल्या पावसाने पुन्हा हीच परिस्थिती उद‌्भवली होती. शहरातील अनेक भागांतील ड्रेनेज, पावसाळी नाले तुंबल्याने दुर्गंधीयुक्त थेट पाणी रस्त्यांवर अाेसंडून वाहत हाेतेे. जुने नाशकातील काही भागात पुन्हा घरात पाणी घुसले. 
 
शहरात पावसाळापूर्व कामे झाली नसल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर महासभेतही नाले साफसफाईचा मुद्दा चांगला गाजला हाेता. यानंतर दिवसभर पावसाचा अंदाज असल्याने शनिवारी शासकीय, निमशासकीय आणि कंपन्यांना सुटी असल्याने नोकरदारवर्गाला घरीच सुटी घालवावी लागली. 

शनिवार असल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुटी होती. मात्र, मराठी माध्यमाच्या शाळा असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पावसात भिजून आनंद घेत होते. तर महाविद्यालयीन युवक-युवतींनी दुचाकींवर फिरून पावसात भिजण्याचा आनंद घेतला. तर नाशिकरोड, काॅलेजरोड, शरणपूररोड, सराफबाजार, जुने नाशिक, द्वारका या परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत होते. तर पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागत होता. तर रस्त्यावरच पाणी साचल्याने चारचाकींमुळे उडणारे पावसाचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत होते. त्यामुळे महापालिकेचे रस्त्याबाबत चुकीचे नियोजन उघड होत आहे. 
 
अाठवडाभर रेंगाळल्यानंतर शनिवारी पहाटेपासून सुरू झालेेल्या संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविणे मुश्किल झाले. पावसामुळे तिबेटियन मार्केटजवळ एक वृक्ष काेसळला. तर जुन्या नाशकातील काही घरांमध्ये पाणी शिरले. शहरात १०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात झाली. 

जून महिना सुरू झाला की प्रत्येकाला पावसाचे वेध लागतात. यंदा मात्र मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांसह शहरवासीयांनाही पावसाची प्रतीक्षा करावी लागली. अखेर गुरुवारपासूनच मान्सूनच्या वाटचालीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने शनिवारी पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली. शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, जेलरोड, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, राणेनगर, नाशिकरोड, डीजीपीनगर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, पाथर्डी फाटा, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, नांदूर, दसक, पंचक, काॅलेजरोड, गंगापूररोड या परिसरात शनिवारी पहाटे पावसाला सुरुवात झाली होती. 

पावसाळी नाले तुंबले, दुर्गंधीयुक्त पाणी थेट घरात 
शहरातील संपूर्ण नाले स्वच्छतेचे कामे होणार अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी जमल्याने संपूर्ण परिसर पाण्यात बुडाले होते. अनेक परिसरातील नाल्यांची स्वच्छता झालेली नसल्यानेच पुन्हा ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. दरवर्षी महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या या माेहिमेत नाल्यांमधील प्लास्टिक, नाल्यांमधील कचरा स्वच्छ करणे, परिसरातील ड्रेनेजचे चाेकअप काढणे, मातीचे ढिग उचलणे आदी कामे या मोहिमेत केली जातात. मात्र, या वर्षी शहरात पावसाळ्यापुर्वीचे कामाच करण्यात आले नसल्यामुळे तसेच ड्रेनेज नाल्यांमधील कचरा स्वच्छ करण्यात आला नसल्यामुळे रविवारी ठिकठिकाणी त्याचा परिणाम दिसून आला. शनिवारीही जुने नाशिक भागातील काही घरात पाणी घुसल्याने घरातील साहित्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले. 
 
बातम्या आणखी आहेत...