आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस, गारठा आणि 12 तास विज पुरवठा खंडित झाल्‍याने नाशिककर हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पावसाळ्यात रेनकाेट तर हिवाळ्यात उबदार कपडे घातले गेल्यास नवल नाही; पण रेनकाेटसह उबदार कपडे एकाचवेळी घालण्याची किमया मंगळवार (दि. ५) च्या वातावरणाने करून दाखविली. ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. बाेचऱ्या थंडीनेही नागरिकांना हैराण केल्याने शहरातील जनजीवन पूर्णत: ठप्प झाले हाेते. त्यातच वीजपुरवडा १० ते १२ तास खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले हाेते. थंडी पाऊस अशा दुहेरी माऱ्याने त्रस्त झालेल्या नाशिककरांनी घराबाहेर पडण पसंत केले. त्यामुळे रस्ते सुनसान हाेते. कार्यालयीन परिसरात कर्मचारी चहाचे झुरके घेत असताना दिसत हाेता. दिवसभर पावसाळ्यासारखे चित्र हाेते.

 

ओखी चक्रीवादळामुळे प्रभाव नाशिक जिल्ह्यावरही पडला असून, त्यामुळे मंगळवारी (दि. ५) दिवसभर पावसासह बोचऱ्या थंडीचा सामना नाशिककरांना करावा लागला. हे वातावरण आरोग्यासाठी विशेषतः दमा, कफ आणि संधिवाताच्या रुग्णांसाठी अतिशय घातक असून पुढील काही दिवस कान, नाक, डोके, तळहात आणि तळपाय झाकूनच वावरावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

 

अशा वातावरणाचा कुणाला धोका
वात,कफ, दमा आदींचा त्रास असलेल्या रुग्णांना, बालक, वृद्ध आणि गर्भिणी यांना सर्वाधिक धोका कोणते विकार वाढतील? सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, सर्दी, खोकला, दमा, अपचनाचा त्रास असणाऱ्यांना.

 

हे टाळावे
- कामाशिवाय बाहेर फिरणे..
- हॉटेलमधील पदार्थ खाणे.
- उघड्यावरील पदार्थ खाणे.
- फ्रीज वा माठातील थंड पाणी.
- दही, ताक.
- कडधान्य, डाळीचे पदार्थ.
- जास्त व्यायाम करणे.


हे करावे
- कोमट पाणी प्यावे.
- सुंठ टाकून पाणी प्यावे.
- आल्याचा रस घ्यावा.
- हळद टाकलेल्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
- खाण्यात मसाल्याच्या पदार्थांचे सेवन वाढवावे.
- शरीरात नैसर्गिक ऊर्जानिर्मिती होईल असे पदार्थ खावेत.
- उबदार कपडे परिधान करावे.
- अांघोळीपूर्वी शरीराला कोमट तेल लावावे; सांधेदुखी टळेल.
- हलकासा व्यायाम करावा.

बातम्या आणखी आहेत...