आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरसल्या जलधारा : गंगापूर धरण 62 टक्के भरले; दारणा, मध्यमेश्वरमधून विसर्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/पुणे/जळगाव - गुरुवारी सायंकाळपासून  नाशिक जिल्ह्यात धो धो कोसळणाऱ्या  मुसळधार पावसामुळे  धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढली. गंगापूर धरण  शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ६२  टक्के भरले हाेते. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या आठ तासांच्या कालावधीत तब्बल १० टक्क्यांनी तर दोन दिवसांत १७ टक्क्यांनी वाढ झाली. पाण्याची आवक पाहता गंगापूरमधूनही शनिवारी पाणी सोडण्याची शक्यता आहे. दारणा धरणात २४ हजार १५८ क्युसेकने पाण्याची आवक होत असल्याने शुक्रवारी सकाळी ५०० क्युसेकने सुरू असलेल्या पाणी विसर्गात सायंकाळी ५ वाजता  वाढ करत १२७५१ क्युसेक इतका करण्यात आला. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून एक वेळ ५२ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.    
 
गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर मध्यरात्री वाढत गेला. शिवाय इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या धरणांच्याच परिसरात अधिक पाऊस पडल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने होत आहे. दारणा धरणात १२ हजार क्युसेकने तर गंगापूरमध्ये ६५०० क्युसेकने पाणी येत आहे. शिवाय बेझे, काश्यपी धरणेही भरत असल्याने गंगापूरमधील आवक रात्रीतून वाढण्याची शक्यता आहे. शिवाय  पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने आता पाटबंधारे विभागानेही धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.   
 
सर्वच धरणांत ३३ टक्के जलसाठा  
इगतपुरी तालुक्यात १२ तासांत तब्बल १९२ मिमी पावसाची नोंद झाल्याने दारणासह परिसरातील धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. तर नांदूर मधमेश्वरमधून २२ हजार ३८४ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. गंगापूर धरणात सायंकाळी ५ वाजता ६२ टक्के म्हणजे ३४००  दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होते. दारणाच्याही  ७१ टक्के पाण्यासाठ्यात वाढ होत तो सायंकाळी ५ वाजता ७५ टक्के  झाला.   गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा ८ टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून शुक्रवारी ३३ टक्के पाणी होते. गतवर्षीही तो साठा ३४ टक्के हाेता.  यंदा पावसाला उशिर झाल्याने यात काहीसी घट जाणवत अाहे.
 
पुणे परिसरात दमदार पाऊस; पानशेत धरण निम्मे भरले
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, पानशेत, खडकवासला, वरसगाव या चार धरण क्षेत्राच्या परिसरातील मागील दाेन ते तीन दिवसांपासून दमदार पाऊस हाेत अाहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ हाेत अाहे. चार धरणांत मिळून ८.९९  टीएमसी पाणीसाठा जमा झाला  अाहे.    
पानशेत धरणाची एकूण क्षमता १०.६५ टीएमसी असून या धरणात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.३३ टीएमसी म्हणजेच ५० टक्के पाणीसाठा हाेता. वरसगाव धरणात ३.१३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून एकूण पाणीसाठा क्षमतेच्या २५ टक्के पाणी जमा झाले अाहे. टेमघर धरणात १०.८४ तर खडकवासला धरणात ९.३७ टीएमसी पाणी अाहे. खडकवासला धरण ३२.१४  टक्के भरले असून धरण परिसरात पावसाची रिमझिम चांगल्याप्रकारे सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ हाेत अाहे. लाेणावळा परिसरातही जाेरदार पाऊस सुरू असून सदर परिसरातील इंद्रायणी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ हाेऊन माेठ्या प्रमाणात पाणी वाहत अाहे. तर पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत गेला अाहे.
 
खान्देशात प्रतीक्षा संपली; जळगावात १९ मिमी पाऊस
जळगाव - अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्ह्यात परतलेल्या पावसाने शुक्रवारी चांगली हजेरी लावली. जिल्हाभरात सरासरी १९ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. तसेच येत्या ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये जाेरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला अाहे.   पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे दाेन दिवसांपासून  जिल्ह्यात पुनरागमन झाले अाहे. दाेन दिवसांच्या ढगाळ वातावरणात गुरुवार अाणि शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पाचाेरा, जामनेर, रावेर, पाराेळा तालुक्यात पावसाचा जाेर चांगला हाेता. मुक्ताईनगर तालुक्यात रिमझिम हजेरी लावलेल्या पावसाने बाेदवड तालुक्यात मात्र अवकृपा कायम ठेवल्याने तेथे खरिपाची पेरणीदेखील अद्याप हाेऊ शकलेली नाही. शुक्रवारी जळगाव तालुक्यात ४.७ मिलिमीटर, जामनेर २७.९ मिमी, एरंडाेल २९.५ मिमी, धरणगाव ७.८ मिमी, भुसावळ ८ मिमी, यावल ३६.७ मिमी, रावेर २६.१ मिमी, मुक्ताईनगर १५.८ मिमी, बाेदवड २.३ मिमी, पाचाेरा ४३.१ मिमी, चाळीसगाव १९.४ मिमी, भडगाव २३ मिमी, अमळनेर ३.६ मिमी, पाराेळा ४१ िममी तर चाेपडा तालुक्यात ६.९ मिलिमीटर पाऊस झाल्याची नाेंद झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...