आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राजीव गांधी जीवनदायी’च रुग्णांसाठी बनलीय तापदायी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत वार्षिक एक लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबीयांना तब्बल ९७२ आजारांवर उपचार शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. सर्वसामान्यांना पैसा उपलब्ध नसल्याने अनेक व्याधी जडूनही उपचार करता येत नाहीत. मध्यमवर्गीयांना व्याधी जडल्यास पोटाला चिमटे काढून साठवलेला पैसाही उपचारांवरच खर्च होतो. परिणामी, मध्यम सर्वसामान्य वर्गातील लोकांना दर्जेदार उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ते दारिद्र्य व्याधींच्या चक्रातच गुरफटून पडतात. अशा लोकांसाठी ही योजना खराेखर जीवनदायी ठरणारी आहे. त्यामध्ये मुतखडा, किडनी स्टोन, मेंदूवर शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, कॅन्सर अशा शेकडो विकारांचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतची आैषधे, उपचार, तपासण्या माेफत करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील काही रुग्णालयांकडून या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी अाहेत. योजनेंतर्गत मंजूर झालेल्या उपचारानुसार रुग्णाला दीड लाख रुपयांपर्यंत मोफत आैषधोपचार आणि तपासण्यादेखील करून देण्याच्या सूचना असताना काही रुग्णालये तर रुग्णांकडून अनेक तपासण्यांसाठीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे आल्या आहेत.

‘संदर्भ’मध्येहीघेतले जातेय तपासण्यांसाठी शुल्क...
राजीवगांधी जीवनदायी अाराेग्य योजनेंतर्गत मंजूर उपचारानुसार रुग्णाला दीड लाखापर्यंत मोफत आैषधोपचार आणि तपासण्यादेखील करून देण्याच्या सूचना अाहेत. मात्र, शासनाच्याच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात या योजनेंतर्गत उपचारासाठी रुग्णांकडून तपासण्यांचे शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीकडे काही रुग्णांनी पाहणीदरम्यान केल्या.

‘जीवनदायी’अंतर्गत मिळालेले कोटी रुपये पडून
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात संपूर्ण विभागातून येणाऱ्या अनेक रुग्णांवर राजीव गांधी जीवनदायी अाराेग्य योजनेंतर्गत उपचार केले जातात. तसेच, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा सर्वाधिक लाभ रुग्णांना मिळून देण्याचा मानही संदर्भ रुग्णालयाला मिळाला आहे. या योजनेपासून मिळालेली कोटी रुपयांची रक्कम रुग्णालय प्रशासनाकडे सध्या पडलेली असून, तिचा वापर अत्याधुनिक यंत्रणेवर करण्यात यावा, अशी मागणीही रुग्ण त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

या रुग्णालयांचा समावेश..
सिव्हिल,संदर्भ, अश्विनी हॉस्पिटल, चोपडा हॉस्पिटल, डॉ. वसंत पवार वैद्यकीय रुग्णालय, जनसेवा हॉस्पिटल, लाइफ केअर, नामको, सुयोग, प्रयास, एसएमबीटी हॉस्पिटल, शताब्दी हॉस्पिटल, श्री बालाजी हॉस्पिटल, सिक्स सिग्मा-नाशिक मालेगाव, सायखेडकर, सुजाता बिर्ला, सिनर्जी, वक्रतुंड, व्हिजन, आयुष बाल रुग्णालय, क्युरी मानवता, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, यशवंत हॉस्पिटल-सिन्नर, सामान्य रुग्णालय-मालेगाव, सिद्धिविनायक हॉस्पिटल-सिन्नर.
डॉ. एल. आर. घोडके आरोग्य उपसंचालक, महाराष्ट्र शासन

लाभार्थ्यांना अाहेत ही कागदपत्रे आवश्यक...
राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या उपचारासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ठराविक रुग्णालयांत पिवळी किंवा केशरी अंतोदय अन्न योजना कार्ड, अन्नपूर्णा कार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना आदी कागदपत्रे अावश्यक अाहेत.

काही ठिकाणी अनामत रकमेचीही करतात सक्ती
या याेजनेंतर्गत रुग्णांना माेफत उपचाराची सुविधा असतानाही शहरातील अनेक रुग्णालयांत रुग्णांकडून अनामत रकमेची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीदरम्यान करण्यात अाल्या. ज्या रुग्णांकडे पिवळी किंवा केशरी शिधापित्रका असेल, त्यांच्यावर तातडीने उपचाराचे आदेश असताना काही रुग्णालयांकडून तातडीने उपचार करण्याऐवजी रुग्णांकडून अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जात असल्याचे िदसून अाले अाहे.

शासनाकडूनही दुर्लक्षच...
माेफत आरोग्य सुविधा देण्याच्या नावाखाली शहरात सुरू करण्यात अालेल्या कमर्शियल हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांची अडवणूक केली जात असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य याेजनेंतर्गत माेफत उपचाराची सुविधा देणाऱ्या रुग्णालयांची अाराेग्य विभागामार्फतच भरारी पथकाद्वारे तपासणी हाेणे गरजेचे आहे. राजीय गांधी आरोग्य जीवनदायी याेजनेच्या अंमलबजावणीकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच या रुग्णालयात रुग्णांना याेग्यप्रकारे सुविधा दिल्या जात नसल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी ‘डी.बी. स्टार’कडे व्यक्त केल्या.

खासगी रुग्णालयांचा असाही फंडा
शहरातील काही नामवंत खासगी रुग्णालयांत उपचारासाठी रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडून अगोदर राजीव गांधी योजनेत उपचारास नकार दिला जाताे. उपचाराचा आग्रह धरलाच तर रुग्णांची फाइल मंजूर करून त्यांना शासकीय रुग्णालयात तपासण्यांसाठी पाठविले जाते. अनेक रुग्णालयांत तर या तपासण्या अामच्या रुग्णालयात होणारच नाहीत, असे सांगितले जाते. यामुळे रुग्णांना संबंधित तपासण्यांवर पैसे खर्च केल्यानंतरच उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करून घेतले जात असल्याचाही प्रकार समोर आला अाहे.

हेल्थकार्डसाठीही चिरीमिरी
लाभार्थीला शासकीय आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यास भेटावे लागते. आजाराचे स्वरूप पाहून लाभार्थीची ओळख पटल्यानंतर आरोग्य अधिकारी संदर्भचिठ्ठी देतो. ती घेऊन लाभार्थीला निवडक रुग्णालयांत उपचारासाठी जाता येते. तिथे आजाराची शहानिशा करून उपचारासाठीची प्रक्रिया सुरू होते. डॉक्टर तपासणी चाचणी करून रुग्णास दाखल करून घेतात. मुख्य म्हणजे, महा ई-सेवा सेतू कार्यालयात हेल्थकार्डसाठी चिरीमिरी घेतली जात असल्याचेही ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.

योजनेंतर्गत होणारे उपचार असे...
लाभार्थींना शस्त्रक्रिया, नेत्र, अस्थिव्यंग, हृदय, किडनी, मेंदू, जठर आणि आतड्याच्या, बालरोग, मूत्रपिंड, मूत्रमार्ग विकार, कर्करोग शस्त्रक्रिया आणि उपचार, मेंदू आणि मज्जासंस्था, मणक्याचे विकार, कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी, भाजलेल्यांवर उपचार, अपघातातील फ्रॅक्चर, अतिदक्षतामधील उपचार, नवजात शिशूंचे उपचार, फुफ्फुस पोटाचे विकार, त्यावरील शस्त्रक्रिया, जळीत रुग्णांवरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्यांच्या फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, एंडोक्राइन आणि इंटरव्हेन्शन रेडिऑलॉजी या उपचारांचा लाभ मिळतो. शिवाय, उपचारादरम्यान निदान झाल्यावर लागणारा औषधोपचार, अाैषधे, शस्त्रक्रिया, उपचार, भोजन, एकेरी प्रवास खर्च आदींचाही योजनेत समावेश आहे.

शासन अादेश, तरीही रुग्णालयांकडून हाेते उपचारासाठी टाळाटाळ...
जिल्ह्यातीलजवळपास २५ रुग्णालयांना राजीव गांधी जीवनदायी अाराेग्य योजनेंतर्गत उपचार शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळालेली आहे. या रुग्णालयांत मल्टिस्पेशालिटी, ३० बेडपेक्षा जास्त, दहापेक्षा जास्त बेड असलेले स्पेशालिटी, ऑर्थोपेडी, लहान मुलांचे, कान-नाक-डोळे-घसा आदी दवाखान्यांचा समावेश आहे. संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाला उपचार शस्त्रक्रियेचा सर्व खर्च राज्य सरकारतर्फे देण्यात येताे. मात्र, काही रुग्णालयांकडून योजनेंतर्गत उपचार शस्त्रक्रियेसाठी टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या अाहेत.
थेट प्रश्न
उदासीनता.. अनेक रुग्णालये उपचारासाठी घेतात पैसे; रुग्णांची फरपट
सर्वसामान्यांना वरदान ठरणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी अाराेग्य योजनेलाच उदासीनतेचा आजार जडल्याच्या तक्रारी अाहेत. गोरगरीबांना माेफत उपचारासाठी शासनाकडून ही योजना सुरू करण्यात अाली असली तरी प्रत्यक्षात मात्र तिच्या अंमलबजावणीसाठी संबंधित रुग्णालये तयार नसल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. योजनेंतर्गत मंजूर झालेल्या उपचारानुसार रुग्णाला दीड लाखापर्यंत मोफत आैषधोपचार आणि तपासण्यादेखील करून देण्याच्या सूचना असताना काही रुग्णालये रुग्णांकडून तपासण्यांसाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे येऊ लागल्या अाहेत. त्यावर हा प्रकाशझोत...
{ राजीवगांधी जीवनदायी आरोग्य याेजनेंतर्गत उपचारासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात का?
-राजीव गांधी जीवनदायी आरोग्य याेजनेंतर्गत उपचारासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही.

{ याेजनेंतर्गतउपचारासाठी काही रुग्णालयांकडून तपासणी शुल्क घेतले जाते. याबाबत माहिती आहे का?
-जिल्ह्यातील ज्याही रुग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य याेजनेंतर्गत तपासण्यांचे शुल्क घेतले जात असेल तर अशा रुग्णालयांची माहिती घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल.

{ जीवनदायीयाेजनेंतर्गत फाइल मंजूर होऊनही काही रुग्णालये रुग्णांकडून अनामत रकमेची सक्ती करतात, असे का?
-राजीव गांधी जीवनदायी आरोग्य याेजनेच्या नियमांत अशाप्रकारे अनामत रक्कम घेणे किंवा त्यासाठी सक्ती करण्याचे कुठेही सांगण्यात आलेले नाही. रुग्णांकडून अनामत रकमेची सक्ती करणे अत्यंत चुकीचेच आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल दाेषी रुग्णालयांवर तातडीने कठाेर कारवाई करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...