आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी सामन्यातील काही गाेड-अांबट क्षण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बडाेदा-उत्तरप्रदेश रणजी सामन्यात पहिल्या दिवशी अवघ्या सहा धावांवर बाद झाल्यापासून काहीसा निराश झालेला सुरेश रैना शुक्रवारी थाेडासा मूडमध्ये अाला. तर, पहिल्या डावात १५ षटके गाेलंदाजी करूनही बळी मिळाल्याने नाराज झालेल्या इरफानने त्यांच्या दुसऱ्या डावात गाेलंदाजीच टाळली.
रैना सामन्याच्या पहिल्याच दिवशी झटपट बाद झाल्यापासून ड्रेसिंग रूममध्ये बसला, ताे मैदानावर येणे साेडाच ड्रेसिंग रूममधूनही फारसा बाहेर अाला नाही. त्यामुळे त्याचे दर्शनही चाहत्यांना दुर्मिळ झाले हाेते. केवळ लंचसाठी जाता-येताना अाणि दिवसभराचा खेळ संपल्यावर परतताना हाेणाऱ्या अाेझरत्या दर्शनासाठी नाशिककर प्रेक्षक तासन््तास थांबत हाेते. ‘रैना, रैना’ नावाचा गजर हाेऊनही ताे प्रेक्षकांकडे बुधवारपर्यंत एक कटाक्षही टाकत नव्हता. परंतु, पहिल्या डावात अाघाडी मिळण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर ताे प्रेक्षकांना हात हलवून प्रतिसाद देऊ लागला. जाळीच्या पलीकडे असणाऱ्या प्रेक्षकांना अाॅटाेग्राफ देण्यासह काही जणांना सेल्फीही काढू देत हाेता. त्यामुळे दाेन दिवस निराश झालेल्या चाहत्यांच्या उत्साहाला भरते अाले हाेते.

‘दिलदार’ इरफान...
बॅटचीदुरुस्ती करून देणारा एक गरीब युवक बडाेद्याच्या फलंदाजांच्या बॅट घेऊन अाला. त्याने संघाच्या सहायकाकडे संबंधित फलंदाजांच्या बॅट दिल्या. त्याचवेळी ड्रेसिंग रूमबाहेरच खुर्चीवर बसलेल्या इरफानच्या बाजूला उभे राहून त्याने एक फाेटाे काढण्याची विनंती तिथे उपस्थित छायाचित्रकाराला केली. ताे गरीब युवक उंच असल्याने त्याला इरफानबराेबर फाेटाे काढण्यासाठी खूप झुकावे लागत असल्याचे बघून इरफानने त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली रिकामी खुर्ची अाेढून युवकाला त्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. इरफानची ही ‘दिलदारी’ बघून उपस्थितांनीही त्याच्यातल्या माणुसकीला मनाेमन सलाम केला. स्टार खेळाडूंपैकी इरफानकडून सर्व प्रेक्षकांना तिन्ही दिवस सातत्याने प्रतिसाद मिळत असल्याने प्रेक्षक त्याच्यावर खूप खुश असल्याचे चित्र अाहे. वहीवर अाॅटाेग्राफ, सेल्फी अगदी गर्दीतही फाेटाेसाठी काही क्षण थांबून इरफान प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करीत अाहे.

अखेर मूडमध्ये अाला सुरेश रैना अन‌् इरफान पठाणने टाळली गाेलंदाजी...
अनेक प्रेक्षक त्यांचा माेबाइल जाळीतून बाहेर काढून रैनाला सेल्फी काढण्यासाठी अाग्रह करीत हाेते. दाेन जणांना असा सेल्फी काढून दिल्यानंतर रैनाने तिसऱ्या प्रेक्षकाचा माेबाइल सेल्फी काढण्यासाठी त्याच्या हातात घेतला. मात्र, घाईगडबडीत कॅमेऱ्याएेवजी चुकून दुसरेच बटण दाबले गेले अाणि त्या स्क्रीनवर ‘भलतेच’ चित्र सुरू झाल्याने रैनासह त्याच्याबराेबर असणाऱ्या अन्य खेळाडूंचीही हसता हसता पुरेवाट झाली.
बातम्या आणखी आहेत...