आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ नाण्यांचा उघडला खजिना, दुर्मिळ नाेटांपासून टपाल तिकिटांपर्यंत सर्व काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेअर फेअर प्रदर्शनात मांडण्यात अालेली दुर्मिळ नाणी. - Divya Marathi
रेअर फेअर प्रदर्शनात मांडण्यात अालेली दुर्मिळ नाणी.
नाशिक - शिवकालीन नाण्यांचा इतिहास उलगडणारे शिवराई हे दुर्मिळ नाणे, जगातील १०० देशांचे चलन असलेली नाणी, थायलंडचे वैशिष्ट्यपूर्ण ट्विन कॉइन, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील दुर्मिळ नाण्यांसह सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त खास काढलेली १२५ रुपयांची नाणी, युनिक अन् स्पेशल स्टॅम्प यांसह लघुचित्र शैलीतील देवीदेवतांचे चित्र.. असा खजिना पाहण्यासाठी नाशिककरांची एकच गर्दी झाली होती. 
कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्यूमिस्मॅटिक अॅण्ड रेअर आयटेम्स संस्थेच्या वतीने गंगापूररोड येथील चोपडा लॉन्समध्ये दुर्मिळ नाणी प्रदर्शनाचे (रेअर फेअर) आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद््घाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी इतिहासाच्या अभ्यासक मंजिरी भालेराव, मिंटेज वर्ल्डचे सुशीलकुमार अग्रवाल, हर्षल नाईक, अनंत धामणे, अॅड. राजेंद्र जुन्नरे, राहुल कुलकर्णी, उमेश वरखेडे, भूषण टाटिया, अनिता जोशी, मिलिंद पगार आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. जानेवारीपर्यंत ‘रेअर फेअर’ सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात शिवाजी महाराजांच्या काळातील नाण्यांपासून ते आताच्या नवीन नोटांपर्यंतचा प्रवास अनोख्या पद्धतीने उलगडण्यात आला आहे. दुर्मिळ नाण्यांच्या माध्यमातून विविध देशांच्या चलनाचा इतिहास उलगडण्यात आला. दुर्मिळ मौल्यवान ठेवा नव्या पिढीला माहिती होण्यास हे प्रदर्शन फायदेशीर ठरणार असल्याने विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी यावेळी केले. या प्रदर्शनात काही नाशिककरांनी दुर्मिळ नाणी वस्तूंची खरेदी केली. 

दुर्मिळ नाण्यांच्या संग्रहकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 
कलेक्टर्ससोसायटी ऑफ न्यूमिस्मॅटिक अॅण्ड रेअर आयटेम्स संस्थेच्या वतीने दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणाऱ्या व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात इंदूरचे गिरीश शर्मा, तर जयंत हुन्नरगीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 

 
बातम्या आणखी आहेत...