आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या कुरघोड्या पुन्हा चव्हाट्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पालिकेतीलसत्ताधारी राष्ट्रवादी, भाजप खाविआमधील अंतर्गत राजकारणानंतर आता सत्ताधारी राष्ट्रवादीतच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी नगरसेवक सभागृहात एकमेकांची वैयक्तिक द्वेषातून उणीदुणी काढत असल्याने विरोधकांचेच काम करीत आहेत. या सर्व प्रकारांमुळे शहरातील विकास कामांना बाधा येण्याची चिन्हे आहेत. सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्याने शहरवासियांना आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताची आठवण होत आहे.

नगपालिका सभागृहात सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे काम पूर्ण करून सभा गाजवली. प्रथम माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी तिमाही खर्चावर आक्षेप नोंदवला. यासह बहुतांश विषयांतील चर्चेतही सहभाग घेतला. जनतेच्या हिताचे मुद्दे नेमाडे यांनी सभागृहासमोर उपस्थित केले. मात्र, यानंतर सत्तेतील राजेंद्र आवटे, शारदा झोपे, आरिफ गनी आणि खुद्द राष्ट्रवादीचे गटनेते हाजी नईम पठाण यांनी गडकरीनगर भागातील जलकुंभ सुरू करण्यासाठी ठिय्या मांडला. जनतेच्या या व्यापकप्रश्नी सभागृहात वारंवार प्रश्न मांडले गेले. तांत्रिकदृष्ट्या हा प्रश्न कोणीही सोडवू शकत नाही, अशी स्थिती असतानाही हा ठिय्या मांडून नगराध्यक्ष विजय चौधरी आणि पाणीपुरवठा सभापती जरिया मिनू शिवरतन यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला. एकंदरीत जनतेचे प्रश्न मांडत असल्याचे दर्शवून वैयक्तिक कुरघोड्या करण्याची ‘राजकीय खेळी’ या बैठकीत दिसून आली. सत्ताधारी गटानेच ही खेळी करीत विरोधकांचेच काम सभागृहात केले हे विशेष. यापूर्वी सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील वाद समोर यायचे. आता मात्र सत्ताधाऱ्यांतीलच वाद समोर अाल्याने आगामी काळात काही प्रमाणात का होइना, होऊ घातलेली कामेही खोळंबणार असल्याची स्थिती आहे.

पत वाढवणे गरजेचे
शहरातीलप्रभाग क्रमांक एकमधील रस्त्यांचे तब्बल चार ते पाच वेळा टेंडर काढले गेले. मात्र, त्यास कोणीही ठेकेदार मिळत नाही. निधी उपलब्ध असूनही केवळ ठेकेदारांचे बिल निघत नाही, म्हणून कोणीही पालिकेचे काम घेत नाही. सत्ताधाऱ्यांनी एकमेकांची उणीदुणी काढून वैयक्तिक भांडणे करण्यापेक्षा पालिकेची बाजारातील पत वाढवणेही नितांत गरजेचे आहे.

कुरेशींनी केले अंतर्मुख
पालिकेच्यामाध्यमातून एकही विधायक काम तीन वर्षांत झालेले नाही. नगरसेवक जलील कुरेशी यांनी आपण सत्तेत असूनही उपयोग होत नसल्याचा पुनरूच्चार या बैठकीत करून सत्ताधाऱ्यांना अंतर्मुख केले. एकंदरीत कामे का होत नाहीत? याबाबत कोणीही आत्मचिंतन करीत नाही. मुख्याधिकारी मिळावा, अशी एकमुख मागणी नगरसेवकांनी कधीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली नाही, हे विशेष!

प्रशासनाला नाही धाक : सत्ताधाऱ्यांनाविकासात्मक कामांतही कुरघोड्या करण्याच्या सवयींमुळे आधीच मरगळ असलेले प्रशासन अजून ढिम्म झाले आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर सत्ताधारी विरोधकांचा दबावच राहिला नाही. याचा परिणाम शहरवासीयांवर होत असून, त्याचा उद्रेक हाेण्याची चिन्हे आहेत.