आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: पाणीपट्टीसह मालमत्ता करात 5 टक्के वाढीची शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थासह नेहरू अभियानात करण्यात अालेल्या कामांचा महापालिकेवर पडलेला बाेजा, भूसंपादनावर हाेणारा खर्च, नववसाहतींत देण्यात येणाऱ्या साेयी सुविधा, रस्ते, पाणी अाणि अन्य मूलभूत साेयीसुविधांवर हाेणारा वारेमाप खर्च याची परिणती म्हणून महापालिकेच्या तिजाेरीत वर्षभरात ७३.३८ काेटींची तूट अाढळून अाली अाहे. त्यातच ८७५.७४ काेटींचे बंधनात्मक दायित्व महापालिकेवर असल्याने नाशिककरांवर अाता करवाढीचा वरवंटा फिरवला जाणार अाहे.
 
सर्वसाधारण मालमत्ता करात तब्बल १४ टक्के तर पाणीपट्टीच्या दरात टक्के प्रस्तावित करण्यात अाली अाहे. पाणीपट्टीच्या दरातही वाढ करण्याची शिफारस करण्यात अाली अाहे. 
पालिकेच्यावतीने सन २०१६ -१७ साठीचा सुधारित सन २०१७-२०१८ साठी १४१०. ०७ काेटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक मान्यतेसाठी साेमवारी स्थायीसमाेर सादर केले. अायुक्त कृष्णा यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात करवाढीचीे शिफारस करण्यात अाली अाहे. यासाेबतच पालिकेला उत्पन्नाची साधणे शाेधावी लागणार अाहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात नवीन विकासकामांचा समावेश नसल्याने नगरसेवकांना नवीन कामे करण्यासाठी निधी मिळणे दुरापास्त हाेणार अाहे. २०१६-२०१७ या अार्थिक वर्षातील उत्पन्नातील प्रत्यक्ष अाकडेवारी बघता २०१७ अखेर १४०२.४६ काेटी इतकी रक्कम जमा हाेण्याचा सुधारित अंदाज असून, त्या अनुषंगाने खर्चासाठी १३८९.०८ काेटी अशी अर्थसंकल्पीय अाकडेवारी सादर केली अाहे. गेल्या काही वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरांमध्ये वाढ झाली अाहे. विशेषत: अानंदवली ते गंगागपूर गाव, मखमलाबाद शिवार, कामटवाडा शिवार, टाकळी शिवार, दसक-पंचक शिवार, पाथर्डी शिवार, अाडगाव, म्हसरूळ शिवार बांधकामे वाढल्याने साेयीसुविधांची संख्या वाढली अाहे. त्यामुळे या ठिकाणी मिळकत करांच्या दरात वाढ अावश्यक असल्याचे अायुक्तांनी म्हटले अाहे.
 
अर्थसंकल्पात टक्के वाढीची शिफारस 
सिंहस्थ कामांसाठी २२९.८२ काेटींचा पालिकेवर बाेजा : सिंहस्थकुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने ९१९. २९ काेटीचा अाराखडा मंजुर केला हाेता. मंजुर अाराखड्याच्या तीन चतुर्थांश म्हणजे ६८९.४७ काेटी अनुदान मंजूर करण्यात अाले हाेते. त्यापैकी ६२२.०४ काेटी महापालिकेस प्राप्त झाले अाहेत. मंजूर अाराखड्यातील शासन अनुदान वजा जाता २२९.८२ काेटी अधिक जादा निविदा दर महपालिका निधीतून अदा करावी लागणार अाहे. शासनाने ३५० काेटी रूपयांचे कर्ज उचलण्यास मान्यता दिल्याने महाराष्ट्र बँकेतून २६० काेटी सिंहस्थ कामाकरिता हुडकाेकडून ९० काेटी जेएनएनअारयुएम अंतर्गत घरकुल याेजनेकरता महापालिका हिश्श्यासाठी कर्ज उभारणीस मंजुरी देण्यात अाली अाहे. सिंहस्थाच्या २६० काेटी कर्जापैकी १९० काेटी सिंहस्थ कामांकरिता महापालिका उचलणार असून त्यापैकी ९५ काेटी रक्कमेचे उचललेले अाहे. सन२०१६ -१७ साठी २० काेटी सन २०१७-१८ साठी अावश्यकतेनुसार कर्ज उचलण्यात येणार अाहे. 
 
स्थानिक संस्था कराचा फटका बसणार : स्थानिक संस्था कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्राेत अाहे. मात्र शासनाने ५० काेटी पेक्षा कमी असलेल्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था करातून वगळण्यात अाले अाहे. तसेच २०१७-२०१८ या अार्थिक वर्षात स्थानिक संस्था कर सहायक अनुदान देण्याचे धाेरण निश्चित केलेले नाही. त्यामुळे हे अनुदान प्राप्त झाल्यास मागील वर्षाच्या तुलनेत महसुल कमी प्रमाणात प्राप्त हाेणार अाहे. तरीही सहायक अनुदान मिळेल असे गृहित धरून अंदाजपत्रकात ३६८.८० काेटी तरतूद अनुदान स्वरूपात दाखविण्यात अाली अाहे. 
 
अायुक्तांनी या सुचविल्या उपाययाेजना 
- माॅल, तारांकित हाॅटेल यांच्याकडून विशेष वाढीव दराने मिळकत कर अाकारावे 
- पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ केल्याने तसेच वीज दरवाढ झाल्याने
 
पाणीपट्टीत व्हावी वाढ 
- अाग सुरक्षा दरात वाढ केल्यास पालिकेच्या उत्पन्नात हाेईल काेटींची वाढ 
शहर विकासाला निधीच दर्शविला नाही 
 
- अायुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात शहर विकासासाठीचा निधी उत्पन्नाचे स्त्राेत दाखविण्यात अालेले नाही. नगररचना विभागाकडील कपाटांचा प्रश्न मिटल्यास दाेनशे ते अडीचशे काेटी रुपयांचे उत्पन्न मनपाला मिळेल. गुरूवारच्या सभेत याविषयी सविस्तर चर्चा करू.
-शिवाजीगांगुर्डे, सभापती, स्थायी समिती. 
 
भांडवलीसाठी १३० कोटी होती उपलब्ध 
पालिकेकडे २०१७-१८ मध्ये शिलकीसह जमा हाेणाऱ्या १४१०.०७ काेटी अंदाजीत रकमेतून ८७५.७४ काेटी रूपये महापालिकेचा बंधनात्मक खर्च अाहे. त्यातून सिंहस्थ कामांसाठीचा हिस्सा १० काेटी, जे.एन.एन.एम.यू.अार.एम. साठी ३०.१८ काेटी, मुकणे धरणासाठी ६० काेटी, जमीन संपादन (सिंहस्थासाठी) २४.५० काेटी, स्मार्ट सिटीसाठी ५० काेटी, अमृत याेजनेसाठी २० काेटी, पंतप्रधान अावास याेेजनेसाठी १० काेटी, १९ टक्के राखीव निधी ६७.१० काेटी, सतर उचल रकमा ५५.३५ काेटी, अखेर शिल्लक ५.९८ काेटी वजा जाता १३०. ५८ काेटी रूपये भांडवली कामांसाठी उपलब्ध हाेतील. 
 
अशी कामे असा खर्च 
४७४२.४ ०लक्ष इतका खर्च झाला रस्त्यांवर 
१९१ काेटींचा खर्च सुरू असलेल्या रस्त्यांवर हाेणार 
काेटी इतका खर्च डीपी रस्त्यांवर हाेणार 
१४९.३१ काेटी इतका खर्च संडास, मुताऱ्यांवर 
५७८ लक्ष खर्चाच्या प्रसाधन गृहांच्या कामास मंजूरी 
११५.८४ लक्ष खर्च वर्षभरात पुल सांडव्यांसाठी 
२५७.३२ लक्ष इतका खर्च स्मशान सुधारणेसाठी 
६३७.५६ लक्ष इतका खर्च क्रीडांगणांच्या कामासाठी 
७२६.६५ लक्ष खर्च मागासवर्गीय वसाहतींतील कामांसाठी करण्यात अाला 
१०५.७९ लक्ष इतका खर्च अामदार निधी अंतर्गत 
३०४.४८ लक्ष इतका खर्च खुल्या जागांना संरक्षक भिंत बांधण्यासाठी करण्यात अाला 
 
- मलनि:सारण लाभ करामध्ये प्रत्येकी टक्के तसेच स्वच्छता कर, जललाभ कर, पथकर, शिक्षण कर यामध्ये प्रत्येकी टक्का दरवाढ प्रस्तावित करण्यात आली अाहे. त्याने कोटी ८६ लाख रुपये वाढ अपेक्षित आहे. 
- पाणीपट्टी- पाणीपट्टीच्या दरामध्ये प्रतिवर्षी वाढ प्रस्तावित असून त्यात कोटी ३० लाख ३९ हजार ५३६ रुपये वाढ अपेक्षित आहे. 
 
अंदाजपत्रकातील काही ठळक मुद्दे 
- ट्रॅफिक सिग्नलकरिता कोटींची तरतूद 
- नवीन डीपीरोडकरिता कोटींची तरतूद 
- कालिदास कलामंदिर नूतनीकरण नाट्यगृह दुरुस्तीकरिता १० कोटींची तरतूद 
- नाशिकरोड नवीन नाट्यगृहाची निर्मिती करण्यासाठी तरतूद 
- प्रधानमंत्री आवास योजनेकरिता महापालिकेच्या अंतर्गत १० कोटींची तरतूद 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...