आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नोकरी मेळावा; 3 हजार तरुण सहभागी, 32 कंपन्यांसाठी दीड हजार उमेदवारांच्या मुलाखती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शैक्षणिक वाटचालीनंतर नोकरीच्या अपेक्षेत असणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी शिवसेना नाशिक महानगरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास नाशिक शहरातील, तसेच जिल्ह्यातील तीन हजारहून जास्त युवक-युवतींनी हजेरी लावली. 
जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळावी, त्यांच्यापर्यंत योग्य संधीची माहिती पोहोचवली जावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सीएमसीएस कॉलेज, गंगापूर रोड येथे रविवारी (दि. ७) सकाळी वाजेपासून युवक-युवतींनी नाेकरी मेळाव्यात नोंदणी करण्यास सुरुवात केली. सकाळी ११ वाजेपर्यंत तीन हजार युवक-युवतींची नोंदणी झाली असता नोंदणी थांबवण्यात आली उर्वरित युवक-युवतींना पुढील नोकरी मेळाव्यात नोंदणी करण्याचे सूचित करण्यात आले. कॅपिटा, मॅनपॉवर, पॉलीबॉंड, टाटा डोकोमो, अॅमेझाॅन, फिनोलेक्स पाईप, बजाज ऑटोमोबाईल, बी.व्ही.जी. ग्रुप, डोमिनोझ, टाटा एजकी, आय. एस. एस., पेटीएम, थरमॅक्स, एम डॉक्स, झेंटो, अॅरस इन्फोटेक, एफएस टेक्नो सोल्यूशन, सिसकोड टेक्नोलॉजी, कॅलिबर, पी. आर. असोसिएट, अविस्ता टेलीसिस्टम आदी ३२ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी १५०० हून अधिक युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या. 

नाशिकमधील या नाेकरी मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद पाहून दर चार महिन्यांनी अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी यावेळी जाहीर केले. नोकरी मेळाव्याच्या उद‌्घाटन प्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, आर. डी. धोंगडे, सत्यभामा गाडेकर, शाम साबळे, नयन गांगुर्डे, संतोष गायकवाड, सीएमसीएस कॉलेजचे प्राचार्य शिंदे, गोकुळ पिंगळे, वैभव ठाकरे, पप्पू मराठे, आदित्य बोरस्ते आदी उपस्थित होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...