आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिचा-विशाखाची नृत्यातून गुरुवंदना; अरंगेत्रम नृत्यांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नृत्य आणि रंगमंच यांचे नाते अविरत टिकून राहावे यासाठी रंगमंच, नवोदित नृत्यांगनांचे गुरुजन आणि रसिक प्रेक्षक यांना ‘पुष्पांजली’ या ईशस्तवनातून अभिवादन करत रिचा लोढा आणि विशाखा जोशी यांच्या ‘अरंगेत्रम’ची सुरुवात झाली. विविध रागांवर सादर करण्यात अालेल्या नृत्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. मुळात शंकराने आदिशक्ती पार्वतीला शिकवलेली ही नृत्यकला आंतरराष्ट्रीय स्तरावर जोपासणाऱ्या या दोन नृत्यांगनांंनी नाशिककर रसिकांसमाेर सादर केली. 

भरतनाट्यम अरंगेत्रम कार्यक्रमामध्ये डॉ. संगीता पेठकर यांच्या शिष्या रिचा आणि विशाखा यांनी नृत्य सादर केले. शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी कालिदास कलामंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला पुष्पांजली हा नाटई राग आणि आदितालातील नृत्यप्रकार सादर झाला. यानंतर रामस्तुती, जती स्वरम, शब्दम हे तिश्रा त्रिपुट रागातील नृत्य, दशावतार हे राग रागमालिका आणि आदितालातील नृत्य, हे श्याम सुंदर हा अभंग, मोगरा फुलला हा अभंग, राग वृंदावनी आणि आदितालातील तिल्लाना हा नृत्यप्रकार तसेच मंगलम् हा नृत्यप्रकारही सादर झाला. 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलिस आयुक्त डाॅ. रवींद्र सिंगल यांनी भारतीय कलाच देशाला समृद्ध करणारी आहे. हे कलाकार भारताचे नाव जागतिक स्तरावर नेतील, असेही ते म्हणाले.
 
मोरशिंग वाद्य आणि ३० वर्षांचा अनुभव.. 
मंचावरील वाद्यवृंद अतिशय अनुभवी आणि निष्णात होता. त्यांत गोपाल हे वयोवृद्ध गृहस्थ मोरशिंग नावाचे प्रचलित पारंपरिक वाद्य वाजवत हाेते. त्यांना या वाद्यवादनाचा ३० वर्षांचा अनुभव अाहे. त्यांच्यासह विष्णुदास एस. मानालार, के. दक्षिणमूर्ती पिल्लई, सतीश शेषाद्री, संजय शशिधरन, अविनाश बहिरवाद अादी अनुभवी वादकांनी साथसंगत दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...