आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणहक्क’साठी पहिली फेरी, साेडतीत 3137 विद्यार्थ्यांची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षणहक्क प्रवेश साेडत सुरू हाेताच पालकांनी अापल्या माेबाइल कॅमेरे सुरू करत साेडत क्रमांकांचे छायाचित्रण सुरू केले. - Divya Marathi
शिक्षणहक्क प्रवेश साेडत सुरू हाेताच पालकांनी अापल्या माेबाइल कॅमेरे सुरू करत साेडत क्रमांकांचे छायाचित्रण सुरू केले.
नाशिक- शिक्षणहक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये (२५ टक्के) राखीव जागांवर ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी (दि. ६) शिक्षण विभागातर्फे पहिल्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. जिल्हाभरातील ४५८ शाळांतील हजार ३८० जागांसाठी पहिल्या फेरीत हजार १३७ विद्यार्थ्यांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली.
 
त्यातील २०७ पालकांना एकापेक्षा जास्त शाळांत सोडत लागल्याने या मुलांना पसंतीनुसार प्रवेशासाठी शाळेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, तर २० मार्चला दुसऱ्या फेरीसाठी सोडत काढली जाणार अाहे. 
 
बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) पात्र शाळांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.
 
जिल्हाभरातील ४५८ शाळांपैकी ३९१ शाळांसाठी १९ हजार ४७५ अर्ज दाखल झाले होते. पालकांनी एकापेक्षा जास्त शाळांत अर्ज केल्याने त्यातील हजार ११५ अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली. उर्वरित सहा हजार ७४९ विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया अपूर्ण राहिली. ‘शिक्षणहक्क’च्या एकूण हजार ३८० जागांसाठी शासकीय कन्या अध्यापक विद्यालयात शिक्षण विभागाने प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी सोडत जाहीर केली. त्यात हजार १३७ विद्यार्थ्यांची निवड झाली. पालकांना १५ मार्चपर्यंत शाळेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावयाची आहेत. 
 
प्रवेश नाकारल्यास तक्रार करावी 
शिक्षण हक्क प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या पालकांना सोडतीद्वारे मिळालेल्या शाळेची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे. पालकांनी संबंधित शाळेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. एखाद्या शाळेने प्रवेश देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित पालकांनी १५ मार्चपर्यंत जि. प. शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करावी. पालकांना तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...