आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक - दोनशे वर्षांची परंपरा, बाशिंगे दाजीबा विराची पारंपरिक मिरवणूक जल्लोषात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाजीबा वीराचे यावर्षीचे मानकरी असलेले अमित बेलगावकर यांना पारंपरिक पोशाखाने सजविण्यात आले होते. - Divya Marathi
दाजीबा वीराचे यावर्षीचे मानकरी असलेले अमित बेलगावकर यांना पारंपरिक पोशाखाने सजविण्यात आले होते.
नाशिक - धुलीवंदनाला दरवर्षी मूळ नाशिक अर्थात जुने नाशिक परिसरातून बाशिंगे दाजीबा विराची मिरवणूक पारंपरिक पध्दतीने काढली जाते. या मिरवणूकीमागे अख्यायिका व दोनशे वर्षांची परंपरा आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाजतगाजत बुधवार पेठेतून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. दाजीबा वीराचे यावर्षीचे मानकरी असलेले अमित बेलगावकर यांना पारंपरिक पोशाखाने सजविण्यात आले होते.  

अंगाला हळद लागलेल्या नवरदेवाला मृत्यू आला आणि त्याची लग्नाची इच्छा अपूर्णच राहिली. यामुळे डोक्यावर देवाचा मुकुट अन् बाशिंग बांधून अंगाला हळद लावून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो, अशी कथा व अख्यायिका या पारंपरिक मिरवणूकीमागे आहे. बुधवारपेठेतून वाजत गाजत निघालेल्या या मिरवणूकीचा समारोप मंगळवारी 14 रोजी पहाटेच्या सुमारास होणार असून संपुर्ण जुने नाशिक परिसरातील गल्लीबोळातून मिरवणूक मार्गक्रमण करते.
 
पुढे पाहा, विविध वेशभुषांत मिरवणुकीत सहभागी झालेले चिमुरडे...
बातम्या आणखी आहेत...