आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीने चाैर्यकर्म करणाऱ्या सवती जेरबंद, रिक्षाप्रवासात दागिने, पर्स लांबवायच्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रिक्षामध्ये बसलेल्या सहप्रवासी महिलांच्या पर्सची चोरी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. मंगळवारी सकाळी कालिका मंदिर परिसरात पथकाने ही कारवाई केली. संशयित महिलांकडून अकरा हजारांची रक्कम पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात अाले. एका रिक्षाचालकाच्या समयसूचकतेमुळे पाेलिसांना ही कारवाई करता अाली. दरम्यान, संशयित महिला या सवती असून, त्यांच्या पतीच्या सूचनेनुसार दाेघी चाैर्यकर्म करत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिमार ते नाशिकरोड प्रवासादरम्यान, रिक्षातील सहप्रवासी म्हणून बसलेल्या या संशयित महिलांकडून इतर महिला प्रवाशांच्या पर्स दागिने चाेरी हाेण्याच्या घटना घडत हाेत्या. अशा गुन्ह्यांची भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांनी काही रिक्षाचालकांना ‘खबरी’ बनवले आहे. या रिक्षाचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कालिका मंदिर परिसरात दोन संशयित महिला पैसे मोजत असल्याचे एका जागरूक रिक्षाचालकाच्या लक्षात आले. दोन दिवसांपूर्वी या महिलांनी नंदुरबार येथील एका महिलेची अशा प्रकारे पर्स चोरी केली होती. तेव्हापासून हा रिक्षाचालक अशा वर्णाच्या महिलांचा शोध घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार कालिका मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला संशयित महिलांची चौकशी केली असता या महिला अाैरंगाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले. महिला पोलिसांनी या महिलांची झडती घेतली असता अकरा हजारांची रक्कम अणि पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात अाले. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक महाजन, उपनिरीक्षक महेश हिरे, हवालदार मधुकर घुगे, सुहास क्षीरसागर, दीपक रेरे, भगीरथ नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोघी महिला सराईत चोर असून, त्यांच्याकडून पर्स चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपासी पथकाने व्यक्त केली आहे. दोघी महिलांचा ताबा भद्रकाली पोलिसांनी घेतला. सर्वाधिक चोऱ्या शालिमार परिसरात केल्याची कबुली संशयित महिलांनी दिली.

चाेरीसाठी बालकांचा साेयीने वापर
संशयितदोघी महिलांना एक-एक वर्षाचे मूल आहे. रिक्षामध्ये बसलेल्या सहप्रवासी महिला त्या मुलाशी खेळत असताना अलगद गळ्यातील मंगळसूत्र त्या कापून घेत असत. कधी पैसै पडले म्हणून पर्समधील ऐवज लंपास करत असत.