आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला राेलबाॅलचे विश्वविजेतेपद, सर्व खेळाडूंचा 8 मार्चला दिल्लीत केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते हाेणार सत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बांगलादेशात झालेल्या राेलबाॅल विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावत विजयाची अनाेखी हॅट‌्ट्रिक साधली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या हस्ते भारतीय संघाला चषकासह प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात अाले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गाेयल अाणि केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मार्चला विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार अाहे. 

अांतरराष्ट्रीय राेलबाॅल फेडरेशनच्या वतीने ढाका शहरात स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. खेळाडूंच्या अागमनासह त्यांच्या व्यवस्थेचे अत्यंत चाेख नियाेजन करण्यात अाले हाेते. चाैथ्या राेलबाॅल विश्वचषकाचा उद‌्घाटन साेहळादेखील अत्यंत दिमाखदार पद्धतीने अाणि खेळाडूंच्या संचलनासह पार पडला. 
 
देशभरातील ४३ देशांच्या खेळाडू सहभागी 
अाशिया,अाफ्रिका अाणि युराेपातील देशांचा स्पर्धेत सहभाग हाेता. जगभरातील ४३ देश स्पर्धेत सहभागी झाले हाेते. त्यात अॅथलेटिक्ससाठी प्रख्यात देशांचाही प्रामुख्याने सहभाग हाेता. अजून देशांत या खेळाचा प्रसार झाल्यानंतर खेळाला अाॅलिम्पिकमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय राेलबाॅल फेडरेशनकडून प्रयास केले जाणार अाहेत. 
 
असे अाहेत राेलबाॅलचे नियम 
दाेन्ही संघात प्रत्येकी खेळाडूंचा समावेश असताे. प्रत्येकी २५ मिनिटांचा पूर्वार्ध उत्तरार्ध त्यात मिनिटांचे मध्यंतर असते. ४० मीटर बाय २० मीटरच्या मैदानात इनलाइन स्केट्स घालूनच हा खेळ खेळला जाताे. खेळाडूने स्केटस, नीगार्ड अाणि हेल्मेट घालणे बंधनकारक असते. संघाच्या पाचव्या फाऊलनंतर पुढील प्रत्येक फाऊलला पेनल्टी दिली जाते. 
 
इराणवर मात करून भारत विजेता 
प्राथमिक फेऱ्यांत काही युराेपीय देशांसह अाशियाई देशांवर मात केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ झाम्बियाबराेबर तर उपांत्य फेरीत केनियाबराेबर पडली. दाेन्ही चुरशीचे सामने जिंकून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. इराणबराेबर अंतिम सामन्यात भारत पूर्वार्धात विरुद्ध असा पिछाडीवर हाेता. मात्र, उत्तरार्धात अटीतटीच्या सामन्यात बहारदार खेळ करीत भारताने इराणवर विरुद्ध असा विजय मिळवत अंतिम विजेतेपदावर शिक्कामाेर्तब केले. 
 
- विजेत्या संघातील भार्गव घारपुरे नाशिकच्या के. के. वाघ काॅलेजचा विद्यार्थी 
विजेत्या संघात खेळाडू पुण्याचे असून उर्वरित जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, चंदिगड, केरळ, राजस्थानचे अाहेत. अादित्य गणेशवाडे याने कर्णधाराची जबाबदारी पार पाडली. नाशिकच्या के. के. वाघ इंजिनिअरिंग काॅलेजमधील भार्गव घारपुरे हा १७ वर्षांचा खेळाडू संघातील सगळ्यात लहान वयाचा खेळाडू ठरला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...