आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध परवान्यांसाठी आरटीओची शुल्कवाढ, असे आहे परिवहन विभागाचे वाढीव शुल्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एमव्हीआरच्या अधिनियमानुसार बुधवार(दि. १०)पासून विविध प्रकारच्या वाहन परवान्यांसाठी शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारचे शुल्क भरण्यापोटी मोठा आर्थिक फटका बसणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून गुरुवारपासून वाढीव शुल्क अाकारण्यात येत होते.

आरोग्य विभागाच्या शुल्कवाढीची झळ सर्वसामान्य रुग्णांना बसत असताना आता शासनाने प्रादेशिक परिवहन विभागाच्या शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या शुल्कवाढीचे बुधवारी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना आदेश देण्यात आले आहेत. सर्वाधिक वाढ पर्यटक कॅबव्यतिरिक्त अन्य पर्यटन वाहनांसाठी परवाना देणे अथवा परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पाच हजार शुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी हे शुल्क अवघे ४०० ते ६०० इतके होते. तर नवीन रिक्षा परवान्यासाठी आता २० हजार, तर अाॅटोरिक्षासाठी १० हजार शुल्क करण्यात आले आहे. एमव्हीआर खासगी वाहतूक करणाऱ्या आणि अन्य प्रकारच्या वाहनांसाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे.

भाडेवाढीस पर्याय नाही
परवानाकाढणेआणि नूतनीकरणासाठी भरमसाठ शुल्कवाढ केली आहे. शासनाकडून टोलमाफी करता शुल्कवाढ केल्याने खासगी प्रवासी भाड्यात किमान दहा टक्के वाढ करावी लागणार आहे. या शुल्कवाढीचा प्रभाव सर्वसामान्य नागरिकांंवर पडणार, हे उघड आहे. दिलीपसिंह बेनिवाल, ट्रॅव्हल्स

ग्राहकांचा विचार नाही
ट्रान्सपोर्टवाहनांच्याशुल्कात सुमारे पाच ते दहा टक्के वाढ केल्याने या वाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसणार आहे. शासनाकडून कधीही शुल्कवाढ केली जात आहे. शुल्कवाढ झाल्याने भाडेवाढ अटळ आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी फटका बसणार आहे. मेजर पी. एम. भगत, ग्राहकन्याय मंच

मालवाहतूक वाढणार
शुल्कवाढझाल्यानेभाजीपाल्यासह सर्वच प्रकारचे वाहतूक भाडे वाढविले जाणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. शासनाने शुल्कवाढ करताना सर्वसामान्यांचा विचार केलेला नाही. शुल्कवाढीमुळे जनसामान्यांचे नियोजन कोलमडणार आहे. अंजू सिंगल, अध्यक्ष,ट्रान्सपोर्ट असो.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ..असे आहे परिवहन विभागाचे वाढीव शुल्क