आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसुमाग्रज, नाडकर्णी, जाेशींची रुंग्टा शाळा झळाळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ज्या शाळेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर, प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू बापू नाडकर्णी, थाेर शेतकरी नेतृत्व शरद जाेशी अशी एकाहून एक थाेर विद्यार्थी घडले. त्या अशाेक स्तंभावरील रुंग्टा शाळेला कात टाकून पुन्हा नव्या स्वरूपात झळाळण्याचे वेध लागले अाहेत. जुन्या रूंग्ठा शाळेला पाडून त्या जागेवर अत्याधुनिक ई-लर्निंग सुविधा असलेली शाळा पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत उभारण्यात येणार असून त्या दृष्टीने जुने बांधकाम पाडायला प्रारंभ करण्यात अाला अाहे. 
 
स्वातंत्र्यपूर्व काळात १९१८ साली स्थापन झालेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या या शाळेत २०१८ सालच्या शतकाेत्तरी शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत प्रवेश देण्याचा प्रयास केला जाणार अाहे. १९१८ साली त्याच जागेवर असलेल्या तत्कालीन कर्डीले वाड्यात सुरु झालेल्या न्यु इंग्लीश स्कुलच्या रुपात गत शंभर वर्षात वेळाेवेळी वाढ हाेत गेली. १९३७ साली मुंबईच्या रुंगठा शेठकडून मिळालेल्या देणगीप्रित्यर्थ शाळेचे नामकरण ज्यु.स.रुंगठा अाणि पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालय करण्यात अाले. त्यानंतर काळानुरुप त्या इमारतीत वाढदेखील करण्यात अाली हाेती. काळानुरुप इमारत काहीशी जीर्ण झाल्यामुळेच संस्थेच्या वतीने शतकमहाेत्सवी वर्षात त्या जागेवर नवीन इमारत उभारण्याचा संकल्प करण्यात अाला अाहे. 

या दिग्गजांचा परीसस्पर्श 
रुंग्टा शाळेच्या प्रारंभापासून अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या शाळेत शिकून पुढे गेले अाहेत. त्यात ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज, महान फिरकीपटू बापू नाडकर्णी, संगीतकार सी. रामचंद्र अर्थात रामचंद्र चितळकर, गतवर्षीच निवर्तलेले शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जाेशी, माजी राज्य निवडणूक अायुक्त नीला सत्यनारायण, माजी खासदार उत्तमराव ढिकले, प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील यांसह दिग्गजांनी याच इमारतीत प्रारंभीच्या शिक्षणाचे धडे गिरवले हाेते. 

शतकाेत्तर वर्षात शाळा 
^मराठी शाळेतील मुलांना देखील इंग्लीश माध्यमाच्या ताेडीसताेड शाळेसारख्या सुविधा उपलब्ध करुन देणारी शाळा नाशिकच्या मध्यवर्ती भागात असावी अशा संकल्पासह शाळा उभारण्यात येणार अाहे. २०१८ सालच्या नूतन शैक्षणिक वर्षात मुलांना या अत्याधुनिक शाळेत बसून शिक्षणाचा अानंद घेता यावा, असा अामचा प्रयास राहणार अाहे. -महेश दाबक , कार्याध्यक्ष , नाशिप्र मंडळ 

अाधुनिकतेची कास 
नवीन इमारत ही तळमजला अाणि त्यावर दाेन मजले अशी तीन मजली राहणार अाहे. एकूण ३० वर्ग या शाळेत राहणार असून लर्निंग, लायब्ररी तसेच अत्याधुनिक प्रयाेगशाळेसह परिपूर्ण इमारत उभारण्यात येणार अाहे. त्यात एका सत्रात मुलांचे सर्व वर्ग अाणि दुसऱ्या सत्रात मुलींचे सर्व वर्ग अशी त्याची रचना राहणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...