आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामविकासाच्या याेजना शेवटच्या घटकापर्यंत न्या; ग्रामविकासमंत्री मुंडे याचे अधिकाऱ्यांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या लाेकाभिमुख याेजना राबवण्यात येतात. मात्र, या याेजनांची व्यवस्थित अंमलबजावणी हाेत नसल्याच्या तक्रारी प्राप्त हाेत अाहेत. त्यामुळे नवीन याेजनांच्या मागे न लागता अाहे त्याच याेजना व्यवस्थित राबवून याेजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पाेहाेचवावा, असे अादेश ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले अाहेत.   

सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व विषय समित्यांच्या सभापतींची पुणे येथील जिल्हा परिषदेत बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. बैठकीस कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. या वेळी जिल्हा परिषदेच्या सर्वच याेजनांचा अाढावा घेण्यात अाला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते याबाबतची माहिती संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. यासाेबतच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे म्हणणे एेकून घेण्यात अाले. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करून शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, सर्वांना सारखाच निधी दिला जात असून, शासनाच्या अाहे त्याच याेजनांची व्यवस्थित अंमलबजावणी करा, लाेकांना याेजनांचे महत्त्व पटवून द्या, असा सल्ला देतानाच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र राहून कामकाज करण्याचे अावाहन करण्यात अाले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, समाजकल्याण सभापती सुनीता चाराेस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खाेसकर, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्यासह अिधकारी उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...