आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस.टी.चे 5 हजार 200 कर्मचारी संपाच्या बाजूने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एसटीकामगार संघटनेच्या वतीने प्रस्तावित संपाला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याबाबत संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. २७) मतदान घेण्यात आले. दोन दिवस झालेेल्या या मतदानात 5 हजार २५२ पैकी हजार २०० कर्मचाऱ्यांनी मतदानात सहभाग घेतला होता. यावेळी सर्व मतदान संपाच्या बाजूने झाल्याचे एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 
 
एसटी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीत सुधारणा करून सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, त्यास एसटी प्रशासनाच्या वतीने प्रतिसाद दिला जात नसल्याने एसटी कामगार संघटनेने संप करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विभागातील तेरा आगार, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा या ठिकाणी शुक्रवार (िद. २६) शनिवारी (िद. २७) मतदान घेण्यात आले. नाशिक विभागाचा विचार केला तर, विभागातील ६२५२ कर्मचाऱ्यांपैकी या ५२०० जणांनी मतदान केले. विशेष म्हणजे झालेल्या मतदानापैकी सर्वच मतदान हे संप करण्याच्या बाजूने झाले आहेत. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे घेण्यात आलेले मतदान एकत्र करण्यात येऊन जून रोजी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत संपाबाबतचा ठराव मांडला जाणार आहे. या ठरावाच्या मंजुरीनंतर एसटी प्रशासनाला संपाबाबत नोटीस दिली जाणार आहे. 

संपाच्या बाजूने सर्व मतदान 
^विभागात ५२००कर्मचाऱ्यांनी मतदान केले त्यापैकी सर्वच मतदान संप करण्याच्या बाजूने झाले आहे. राज्य कार्यकारणीत या बाबत ठराव मांडला जाणार असून त्यानंतर पुढची प्रक्रिया पार पडेल. -विजयपवार, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना 
बातम्या आणखी आहेत...