आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली नॅशनल मॅरेथाॅनमध्ये माेनिका अाथरेची बाजी, सचिनच्या हस्ते पुरस्कार वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली मॅरेथॉन जिंकलेल्या मोनिकाचे कौतुक करताना सचिन तेंडुलकर. - Divya Marathi
दिल्ली मॅरेथॉन जिंकलेल्या मोनिकाचे कौतुक करताना सचिन तेंडुलकर.
नाशिक - हाफ मॅरेथाॅनमध्ये वर्चस्व गाजवत असलेल्या नाशिकच्या माेनिका अाथरेने रविवारी दिल्लीत झालेल्या दिल्ली नॅशनल मॅरेथाॅनमध्ये प्रथम क्रमांक पटकावत इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड मॅरेथाॅनसाठीदेखील पात्रता मिळवली अाहे.
 
विशेष म्हणजे दिल्ली मॅरेथाॅनचे पुरस्कार वितरण मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते झाल्यानंतर त्याने माेनिकाचे विशेष अभिनंदन करीत तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माेनिकाने रविवारी राष्ट्रीय स्तरावरील ४२ किलाेमीटरच्या दिल्ली फुल्ल मॅरेथाॅनमध्ये प्रथमच उतरून बाजी मारली. 

तिने हे अंतर तास ३९ मिनिटे सेकंदांत पूर्ण केले. माेनिकाने तिच्या प्रतिस्पर्ध्यांबराेबर काही काळ बराेबरी राखली. मात्र, उत्तरार्धाच्या टप्प्यात इतर स्पर्धकांचा वेग काहीसा मंदावल्यानंतर तिने अाघाडी घेण्यास प्रारंभ केला. त्यामुळेच दुसऱ्या क्रमांकाची प्रतिस्पर्धी असलेल्या ज्याेती गवतेपेक्षा माेनिकाने तब्बल १४ मिनिटांचा वेळ कमी घेतला. त्यातच तिच्या यशामधील वर्चस्व अधाेरेखित झाले अाहे. ज्याेती गवतेने तेच अंतर पूर्ण करण्यासाठी तास ५३ मिनिटे ४८ सेकंद अशी वेळ दिली. तर रंजना कुमारीने तास मिनिटे सेकंद अशी वेळ देत तृतीय क्रमांक पटकावला. 
माेनिका ही साई प्रशिक्षक विजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये सराव करते. या कामगिरीमुळे माेनिका इंग्लंडमध्ये हाेणाऱ्या वर्ल्ड मॅरेथाॅनसाठी पात्र ठरली असून, ती स्पर्धा जून महिन्यात हाेणार अाहे. 

या हाफ मॅरेथाॅनमध्ये चमक 
माेनिकासाठी हे वर्ष खूपच यशस्वी ठरले. या वर्षभरात माेनिकाने दिल्ली एअरटेल हाफ मॅरेथाॅन, मुंबई हाफ मॅरेथाॅन, हैदराबाद हाफ मॅरेथाॅन, बंगळुरू हाफ मॅरेथाॅन या शर्यतींमध्ये बाजी मारली हाेती. तर काही हाफ मॅरेथाॅनमध्ये तिने द्वितीय अाणि तृतीय क्रमांक पटकावले अाहेत. 
 
सचिनच्या हस्ते पुरस्कार वितरण 
भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. माेनिकाला एक लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात अाला. पुरस्कार वितरणानंतर सचिनने माेनिकाला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत भारताचे नाव उंचावण्यात याेगदान देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...