आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी मार्ग रद्द करून दाखवू; नाशिकमधील शिवडे येथील राज्यव्यापी मेळाव्यात शेतकऱ्यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांची बाजू भक्कम आहे. शासनाला कोणत्याही स्थितीत जमीन संपादन करता येणार नाही. दडपशाहीने ती घेण्याचा प्रयत्न केल्यास जनमताचा रेटा, संघर्ष आणि कायद्याची लढाई लढून हा महामार्ग रद्द करून दाखवू, असा इशारा शहापूर येथील सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी भालचंद्र ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.   

शिवडे (ता. सिन्नर) येथे झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, राजू देसले, बबन हरणे, तुकाराम भस्मे, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे  यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. खासदार हेमंत गोडसे यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची भेट घेतली. मेळाव्यास शहापूर, इगतपुरी, सिन्नर, कोपरगाव या तालुक्यांतील शेतकरी व औरंगाबाद, बुलडाणा, जालना, नागपूरसह आदी १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   

समृद्धी महामार्ग फसवा असून त्याने कुणाचीही समृद्धी होणार नाही. शासनाने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत तसा कोणताही कायदा नाही. २६ एप्रिलचे चक्का जाम आंदोलन ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात असल्याचे ते म्हणाले.   

नोटिफिकेशन बेकायदेशीर...
महामार्गाचे नोटिफिकेशन बेकायदेशीर अाहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून मनाई हुकूम काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अॅड. रतनकुमार इचम यांनी सांिगतले. औरंगाबाद येथील राम बाहेती यांनी हा महामार्ग समृद्धीचा नसून बरबादीचा असल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...