आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप यांच्‍या घरी सुरू होती लग्‍नाची तयारी, अचानक फोन आला, \'तुमचा मुलगा शहीद झाला\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  उत्तर काश्‍मीरमधील उरी येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात 17 जवान शहीद झाले. यात महाराष्‍ट्राच्‍या तिघांना वीरमरण आले. त्‍यापैकी एक असलेल्‍या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (24) यांचे दिवाळीनंतर लग्‍न होणार होते. मात्र, डोक्‍यावर अक्षता पडण्‍यापूर्वीच देशासाठी त्‍यांनी आपले बलिदान दिले.  
 
वडील करतात टेलर, भाऊ शेतकरी 

शहीद संदीप यांच्‍या कुटुंबीयांची परिस्‍थ‍िती जेमतेमच आहे.  त्‍यांचे वडील   सोमनाथ ठोक  हे टेलर आहेत तर भाऊ शेती करतो. त्‍यांचे कुटुंब  खडांगळी गावात शेतातच राहते.
 
सुरू होणारी लग्‍नाची तयारी
संदीप हे दोन महिन्‍यांपूर्वी सुटीवर घरी आले होते. त्‍यावेळी त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी त्‍यांच्‍या  लग्‍नााची बोलणी सुरू केली होती. त्‍या अनुषंगाने दिवाळीनंतर संदीप लग्‍नबंधनात अडकणार होते. मात्र, त्‍यापूर्वी त्‍यांना वीरमरण आले.
 
सैन्यदलात होते स्वयंपाकी 
संदीप हे 2012 मध्ये सैन्यदलात स्‍वयंपाकी म्‍हणून भरती झाले होते. सुरुवातीला त्‍यांनी बिहार रेजिमेंटमध्ये सेवा दिली. त्यानंतर 22 मराठा बटालियनमध्ये त्‍यांची बदली झाली होती. उरी येथे त्‍यांना काहीच दिवस झाले होते. यापूर्वी ते  डेहराडूनच्‍या लष्‍कर तळावर कार्यरत होते. 

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संदीप यांचे फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...