आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्त शिखरांचा सुळका चढून सप्तशंृग गडावर कीर्तिध्वज फडकवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सप्तशंृग गड- देवीच्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या श्री सप्तशंृगी गडावर (जि. नाशिक)  शनिवारी मध्यरात्री कीर्तिध्वज फडकला. तत्पूर्वी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी देवस्थानच्या मुख्य कार्यालयात कीर्तिध्वजाची विधिवत झाली. पूजेनंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. ध्वज फडकविण्यासाठी दरेगावचे गवळी पाटील मार्गस्थ झाले.  
  
समुद्रसपाटीपासून ४५६९ फूट उंचीवर सप्तशंृगगड आहे. वर्षभरातून दोनदा कीर्तिध्वज मंदिराच्या शिखरावर फडकवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकविले जाते. दरेगावचे गवळी पाटील यांना हा मान अाहे. ते सप्तशिखरांचा सुळका चढून निशाण लावतात. पूर्वी हे निशाण बेटावद येथून येत हाेते.  मात्र, सप्तशंृग संस्थानची स्थापना झाल्यापासून सप्तशिखरांचा सुळका चढून ध्वज फडकविला जातो. या ध्वजासाठी ११ मीटर कापड, साधारणपणे त्याच मापाची साडीही लागते. जाताना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य या वस्तू ध्वज फडकविणाऱ्याकडे दिल्या जातात. 

दुपारी ४ च्या सुमारास गावातून कीर्तिध्वजाची मिरवणूक काढण्यात अाली. शनिवारी  सायंकाळी साडेसहा वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून पाटील देवीसमोर नतमस्तक हाेऊन पुढील मार्गासाठी रवाना झाले.   या सोहळ्यात उतरेकडील सुळक्यावरून दरेगावचे गवळी  पाटील शिखरावर पोहोचतात. रात्र असतानाही त्यांनी टेंभा किंवा प्रकाशासाठी लागणारे कोणतेही उपकरण सोबत न घेता ते जातात. पाटील ज्या शिखरावर जातात तो रस्ता बऱ्याच भाविकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला किंवा पुन्हा समोर नाही आला. शिखरावर पोहोचल्यानंतर जुना ध्वज काढून त्यांनी तेथे नवा ध्वज लावला. शिखरावर चढण्यासाठी त्यांना ६ ते ७ तास लागले. पाटील यांचे रविवारी पहाटे शिखरावरून मंदिरात आगमन होताच भाविक दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागले.

थकवा क्षणात निघून जाताे   
माझा जन्म झाल्यापासून मी हा कीर्तिध्वजाचा सोहळा अनुभवत आहे. या सोहळ्याचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय असून डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा आहे. यामुळे १०० ते २०० किमी चालून आलेला थकवा क्षणात निघून जातो.   
- राजेश गवळी, दरेगाव.
बातम्या आणखी आहेत...