आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावानाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविराेधात तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  सार्वजनिक वाचनालयाची गेल्या महिन्यात झालेली निवडणूक चांगलीच वादग्रस्त झाली हाेती. ताे वाद अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. जनस्थान पॅनलच्या उमेदवारांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याची तर एका मताने निवडून अालेले धनंजय बेळे यांनीही निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे बेकायदेशीर अाणि घटनाबाह्य काम करत असल्याची तक्रार धर्मादाय अायुक्तांकडे केली अाहे. दरम्यान, रविवारी (दि. ७) बेळे अाणि एका मताने पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांना माधव भणगे यांनी चर्चेसाठी बाेलावले अाहे. 
 
सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक एप्रिल राेजी झाली तर मतमाेजणी एप्रिलला झाली हाेती. या निवडणुकीत जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांना ८९५ तर ग्रंथमित्र पॅनलचे बी. जी. वाघ यांना ८९४ मते मिळाली हाेती. वाघ यांनी फेरमतमाेजणीची मागणी केली हाेती. मात्र, एप्रिलला रामनवमी, तर एप्रिलला सावानाला साप्ताहिक सुटी असल्याचे कारण भणगे यांनी दिली हाेते. यावर मात्र बेळे यांनी अाक्षेप घेतला. घटनेनुसार २४ तासांत फेरमतमाेजणी करायला हवी असे त्यांनी दाखवून दिले. त्यावेळी माेठा वाद झाल्यानंतर भणगे यांनी दाेनही उमेदवारांना कायदेशीर पूर्तता करायची असेल तर ३० दिवसांची मुदत दिली हाेती. ती मुदत शनिवारी (दि. ६) संपली. दरम्यान जनस्थान पॅनलचे उमेदवार अरुण नेवासकर म्हणाले की, माझ्यासह सुरेश गायधनी, मकरंद सुखात्मे अाणि अमित शिंगणे अाम्ही ही निवडणूकच बेकायदेशीर असून घटनाबाह्य काम सुरू असल्याची तक्रार धर्मादाय अायुक्त यांच्याकडे दिली अाहे. तर बेळे यांनीही न्यायालयासह धर्मादाय अायुक्तांना बेकायदेशीर घटनाबाह्य काम सुरू असल्याची तक्रार दाखल केल्याचे बेळे यांनी सांगितले. यावर निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे यांच्याशी रात्री उशिरापर्यंत संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीला काेणताही प्रतिसाद दिला नाही. 
बातम्या आणखी आहेत...