आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सबीआयच्या एटीएमवरच आज भिस्त; असुविधेमुळे नागरिक त्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र शासनाने हजार रुपयांची नोट केवळ बँकेतच जमा कऱण्याचे आणि पाचशेच्या नोटा ठरावीक ठिकाणी स्वीकारण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यत जरी वाढवून दिली तरीही शनिवारी रविवारी बँकांना सुटी असल्यामुळे नागरिकांची चांगलीच गोची झाली. एसबीआयच्या एटीएमव्यतिरिक्त इतर बँकांची एटीएम सेवा बंदच असल्याने नागरीकांचीही पुर्ण भिस्त एसबीआयच्याच एटीएमवर अवलंबून असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. लागल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.
दोन दिवसांची बँकांना सुटी आल्याने गुरुवारपूर्वीच पैसे बँकेतून काढलेल्या आणि हाती अवघे हजार-दोन हजार रुपये असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची गुरुवारच्या निर्णयाने मोठी अडचण झाली. शनिवार आणि रविवारी बँका बंद असल्याने खर्चासाठी पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न निर्माण झालेल्या नागरिकांची भिस्त आता सर्वस्वीपणे एटीएमवरच अवलंबून आहे. पण, सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकडच भरलेली नसल्याने ते बंदच ठेवण्यात आले आहे. तसे फलकही लावण्यात आले आहे. केवळ एसबीआयच्याच एटीएममध्ये रोकड असून, शनिवारी बहुतांशी एटीएममधील रोकड संपल्याने रविवारी एटीएममध्येही पैसे उपलब्ध राहाणार नसल्याने आता ग्राहकांची मोजक्याच एटीएममध्ये गर्दी होण्याची शक्यताही वाढली आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांंनी रोज दोनदा एटीएममध्ये रोकड भरण्याचे आदेश दिल्याने एसीबीआयने दोनदा रोकड भरल्यास ही अडचण दूर होण्याची शक्यताही प्रशासनाने व्यक्त केली आहे.

बिगबझारमध्ये ७० जणांना मिळाल्या नोटा : बँका,पोस्टात नोटा उपलब्धीमुळे निर्माण झालेली गर्दीवर नियंत्रणासाठी शासनाने आता बिग बझार आणि आयनॉक्समध्येही नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिकमध्ये ७० जणांना गुरुवारी सायंकाळासून हजारच्या नोटा नाशिक येथील सिटी सेंटर मॉलमधून नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. यासाठी ग्राहकाला डेबिट कार्ड तेथे स्वॅप करावे लागते. स्वॅप केल्यानंतर तेथून दोन हजार रुपयांच्या नोटा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात आहे. नाशिकरोड येथील बिग बझारमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...