आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय साहित्य खरेदीची सक्ती केल्यास शाळांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शाळांमध्ये प्राथमिक (पहिली) पूर्व प्राथमिक (नर्सरी) या इयत्तांसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरू असून अनेक शाळांकडून प्रवेश देतानाच विद्यार्थ्यांना इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी सांगितले जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत अाहेत. महत्त्वाचे म्हणजे, वह्या पुस्तकांसह गणवेश लेखनसाहित्य अशा विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी सक्ती केली जात असल्याने पालकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केली जात असेल, तर अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी दिला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या सुचनांनुसार शहरातील विविध शाळांमध्ये सध्या प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित, कायम विनाअनुदानित खासगी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू असून, अनेक शाळांकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केली जात आहे. अवास्तव दरात शालेय साहित्य विक्री होत असल्याने पालकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंडही पडत आहे. त्यामुळे शालेय साहित्य खरेदीची सक्ती होत असेल, तर पालकांनी लेखी तक्रारी कराव्यात. संबंधित शाळेकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास शाळेविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षम मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

शिक्षण मंडळाकडून शाळांना अंमलबजावणीचा इशारा
िवद्यार्थ्यांनाप्रवेश देताना शैक्षणिक साहित्य खरेदी ही एेच्छिक असावी, त्यासाठी शाळेकडून दबाव अाणून सक्ती केली जाऊ नये. शैक्षणिक साहित्य देताना अवास्तव पैसे घेऊ नये, शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना याबाबत सूचना देणारे पत्र शिक्षण मंडळाकडून देण्यात अाले अाहे. शाळांनीही त्याची दखल घेऊन अंमलबजावणी करावी.

पालकांनी तक्रारी कराव्यात...
वह्या,पुस्तके, वर्कबुक, लेखनसाहित्य, क्रीडा साहित्य, गणवेश, बूट, स्कूल बॅग अशा प्रकारचे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी सक्ती केली जाते. पालकांनी अशा प्रकारे विक्री होत असल्याच्या महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयात लेखी तक्रार करावी. त्याची चौकशी करून शाळेविरुद्ध कारवाई केली जाईल, असे डाेंगरे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...