आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे अश्रू... कुठे हसू... पालकांचीघालमेल, शिक्षकांची तारांबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक सत्र उत्साहात सुरू व्हावे, यासाठी शाळांनीही विशेष प्रयत्न केल्याचे दिसून अाले. पहिल्याच दिवशी मुलांच्या स्वागतासाठी रांगोळ्या, वर्गांची अाकर्षक सजावट, जय्यत तयारी असे चित्र बघावयास मिळाले. मुख्य म्हणजे जिल्हा परिषद, महापालिका शाळांमध्येदेखील खासगी शाळा, प्री-प्रायमरी स्कूल्सप्रमाणेच प्रचंड उत्साह दिसून अाला. 
 
विद्यार्थ्यांबराेबरच पालकांचीही घालमेल मात्र स्पष्टपणे दिसत हाेती. अापले पाल्य वर्गात बसेल की नाही, त्याचा पहिला दिवस कसा असेल, त्याच्या शिक्षिका काेण अाहेत असे अनेक प्रश्न पालकांना सतावत हाेते. काही ठिकाणी रडून त्रागा करणाऱ्या मुलांना ओढत शाळेत बसवणारे पालकही दृष्टीस येत होते. परंतु, बहुतांश विद्यार्थ्यांत पहिला दिवसाचा उत्साह बघावयास मिळाला. पालक-विद्यार्थ्यांना शाळेबद्दल, वेळापत्रकाबद्दल माहिती देऊन नव्याने सुरू झालेले वर्ग, त्यांचे अभ्यासक्रम याविषयी माहिती देण्यात अाली. 

खेळण्या,कार्टून्समुळे करमणूक 
पहिल्याच दिवशी अभ्यासाचा तणाव नको, तसेच पालकांशिवायही विद्यार्थी अापल्या नवीन वर्गात रमावेत, म्हणून बहुतांश शाळा, प्री-स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांसाठी गप्पागोष्टींचे तास, खेळ, गाणी अादी करमणूक माध्यमांचा वापर करण्यात अाला. यासाठी खेळण्यांबराेबरच वेगवेगळ्या कार्टून्सचीदेखील शिक्षकांना मदत मिळाली. 

पुस्तक वाटप, नवी दप्तरे, नवे पर्व.. 
शाळेच्यापहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, काही शाळांमध्ये नवी दप्तरे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर काही शाळांमध्ये पेन्सिल सेटसारख्या भेटवस्तू देऊन नव्या पर्वाची सुरुवात झाली. यासाठी शिक्षकांनी घेतलेली विशेष मेहनत मात्र सर्वत्र स्पष्टपणे दिसून येत हाेती. 
 
सिडकाे | अंबिकामित्र मंडळ संचलित, डॉ. डी. एस. आहेर प्राथमिक विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव संदीप पाटील, शाळेचे प्रशासन अधिकारी प्रवीण चित्ते, एम. डी. ह्याळीज, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आर. एम. देसले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील अादींसह विविध वर्गांतील विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित हाेते. 

माताेश्री चंद्रभागाबाई जाजू प्राथमिक विद्यालय : राणेनगरयेथील मातोश्री चंद्रभागाबाई जाजू प्राथमिक विद्यालयात नगरसेविका संगिता जाधव, नगरसेविका पुष्पा आव्हाड यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या हस्ते मुलांना गुलाब पुष्प पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी माध्यमिक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्राथमिक विभागाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. 
 
शाळाक्रमांक ४५ ६५ : अमृतधामयेथील विडी कामगार वसाहतीतील मनपा शाळा क्रमांक ४५ ६५ येथे नगरसेवक सुरेश खेताडे, पूनम सोनवणे, गणेश अवणकर , सुनील सूर्यवंशी, सुनील दराडे, दशरथ दिंडे, प्रकाश केकाने, डॉ. घुगे, सोमनाथ गायकवाड, मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर आदींच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले. त्याचबराेबर प्रवेश दिंडीही काढण्यात अाली. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

सीडी मेरी स्कूल : याशाळेतदेखील नवगतांचे स्वागत माेठ्या उत्साहात करण्यात आले. मुख्याध्यापिका पूजा गायकवाड, उपप्रमुख राजश्री वैशंपायन, सहसचिव दिलीप अहिरे, पर्यवेक्षक कृष्णा राऊत, मुग्धा काळकर, मधुकर पगारे यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...