आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक :‘केंब्रिज’मधील प्रत्येक फेरीत निम्म्याहून अधिक बोगस प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंब्रिज शाळेच्या शिक्षणहक् प्रवेशाच्या तपासलेल्या फाइल. - Divya Marathi
केंब्रिज शाळेच्या शिक्षणहक् प्रवेशाच्या तपासलेल्या फाइल.
नाशिक - केंब्रिज शाळेच्या ‘शिक्षणहक्क’ अंतर्गत दिलेल्या प्रवेशाप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात बोगस प्रवेश दिल्याचे उघडकीस होत असतांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या ‘शिक्षण हक्क’च्या प्रत्येक फेरीत निम्म्याहून अधिक बोगस प्रवेश झाल्याचे सोमवारी (दि. २२) चौकशीत समोर आले. केंब्रिज शाळेकडून चौकशी समितीला देण्यात आलेल्या कागदपत्रात २०१६-१७ या वर्षात ८९ प्रवेश संशास्पद निघाल्यानंतर तर यंदा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षणहक्काच्या १०० प्रवेशापैकी ५८ बोगस असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. मंगळवारी (दि. २३) या चौकशी समितीचे काम पूर्ण होणार असून शाळेची मान्यता रद्द करण्याचा अनुदान थांबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे समितीकडून पाठवला
जाणार आहे. 
 
इंदिरानगर भागातील केंब्रिज शाळेने पाल्य, पालक अाणि शिक्षण विभागाचीही फसवणूक करीत पालकांना अंधारात ठेवून त्यांच्या पाल्यांना शिक्षणहक्क प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिल्याप्रकरणी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या माध्यमातून सोमवारी (दि. २२) चौकशीचे काम पूर्ण करण्यात आले असून मंगळवारी (दि.२३) या समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालकांकडे चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. चाैकशी समितीमार्फत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रियेत झालेल्या प्रवेशाच्या पूर्ण कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्यानंतर यात ८९ विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी केंब्रिज शाळेच्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या फाइलमध्ये दिसून आल्या हाेत्या. यानंतर यंदा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्काच्या १०० प्रवेशांपैकी तब्बल प्रवेश ५८ बोगस असल्याचे चौकशीत दिसून आले. चौकशी करत असताना सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी दिसून अाल्या. चौकशी समितीमार्फत अधिक तपासणी केली असता सोमवारी अनेक पालकांचे उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखलेच नसल्याची गंभीर बाब स्पष्ट झाली आहे. तसेच, केंब्रिज शाळेच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पहिल्या ते तिसऱ्या फेरीपर्यंत निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना अपुरी कागदपत्रे घेऊनच प्रवेश दिल्याचे चाैकशीत दिसून अाले.
 
चौकशी पूर्ण, अहवाल सादर करणार 
- केंब्रिज शाळेची चौकशी जवळपास पूर्ण झाली असून मंगळवारी चौकशीचा अहवाल शिक्षण उपसंचालकांसह शासनाकडे पाठवला जाणार आहे. २०१६-१७ या वर्षात ८९ तर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ५८ प्रवेश संशास्पद आहे. शाळेला नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांना या विद्यार्थ्यांचे कागदपत्र सादर करण्याचे सूचना केलेल्या आहेत.
-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा 
 
पुढील स्लाइडवर वाचा, केंब्रीज शाळेत अशे झाले प्रवेश...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...