आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेल्फी’ निर्णयाविराेधात शिक्षक संघटनांचा अांदाेलनाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने पुन्हा नवा प्रयोग करीत शिक्षकांना मुलांबरोबर सेल्फी काढण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यापनाचे कार्य सोडून अशा प्रकारे सेल्फी काढण्याच्या या निर्णयास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विरोध केला असून आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे राज्याध्यक्ष काळूजी बोरसे केली आहे. तर शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केली आहे, तर शिक्षक परिषदेकडूनही विरोध दर्शविण्यात आला असून फेरविचार करण्याची मागणी केली अाहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या अंतर्गत वेगवेगळी निर्णय घेतले आहे. एकीकडे मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यभर शिक्षण परिषद डिजिटल कार्यशाळा, तंत्रस्नेही शिबिरे घेतली जात असून, त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण होत असून उपस्थितीत वाढ होत आहे. मात्र, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नावाखाली दर सोमवारी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढण्याचा घेतलेला निर्णय शिक्षण व्यवस्थेवर अविश्वास दाखवल्यासारखा आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी निर्माण केलेले स्थान शाळांचा झालेला कायापालट याकडेही शासनाने दुर्लक्ष केल्याचेही समितीने म्हटले आहे. सातत्याने शिक्षण विभागाकडून वेगवेगळे शासननिर्णय घेऊन शिक्षकांवर विविध प्रयोग करत आहेत. परिणामी या सर्व ऑनलाइन असलेल्या योजनांमुळे शिक्षक अध्यापनापेक्षा सदर माहिती देण्यात गुंतवला जात आहे. सरल प्रणालीतील डाटा अद्याप पूर्ण नसताना शालेय पोषण आहार माहिती भरणे, शिष्यवृत्ती ऑनलाइन भरणे, त्यातच आता “सेल्फी” काढणे यामुळे समाजातील घटक पालक यांचाही प्रचंड रोष ओढवला जाणार आहे. वस्ती-वाडी आदिवासी दुर्गम ग्रामीण भागातील शाळांमध्ये इंटरनेट सुविधांचा अभाव, वीज जोडणी नसल्याने शिक्षकांना अडचणीना तोंड द्यावे लागते. ऑनलाइन माहितीमुळे आर्थिक तरतूद नसताना आर्थिक झळ सोसावी लागते. राज्यातील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित असताना शिक्षक संघटना अथवा त्यांचे प्रतिनिधी यांना विश्वासात घेता शिक्षण विभाग सतत नवा प्रयोग शिक्षकांवर लादत असल्याने राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना घेऊन राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून अांदोलन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
गुणवत्तावाढीकडे अधिक लक्ष देण्याची गरज
^शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्याची गरज असताना शिक्षण विभागाकडून वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहे. सरल प्रणालीमध्ये माहिती सादर करण्यात शिक्षकांचा अधिकचा वेळ जातो. त्यामुळे अध्यापनावरही त्याचा परिणाम होत असल्याने सेल्फीचा निर्णय मागे घ्यावा. -राजेंद्र निकम, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक महासंघ
प्रायोगिक स्तरावर प्रकल्प राबवावा
सततनवे प्रयोग राबविण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांना अध्यापन कार्यापासूनच दूर नेले जात आहे. शिक्षण विभागाने हा प्रयोग प्रारंभी जिल्हास्तरावर प्रायोगिक पातळीवर राबवावे. त्यानंतर राज्यभरात त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र दिघे यांनी केली आहे.
फेरविचार करावा
^शिक्षकांना अध्यापनासाठी जास्त वेळ मिळावी यासाठी प्रयत्न होण्याची गरज असताना शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करावा. -बी. यू. अहिरे, कार्यवाह, शिक्षक परिषद, नाशिक विभाग
बातम्या आणखी आहेत...