आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिक्षणहक्क’तील पाल्यांचे प्रवेश रद्द करा, एेपतदारांकडून मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साहेब अामची अार्थिक स्थिती चांगली अाहे...शाळेने आमच्या पाल्यांचा प्रवेश शिक्षणहक्कत केल्याची माहिती आम्हाला आताच मिळाली. आम्ही तर लाखो रुपये पगार कमवतो..फी भरण्याची अामची एेपत असल्याने आमच्या पाल्यांचा प्रवेश शिक्षणहक्कच्या यादीतून रद्द करावा, अशी मागणी शुक्रवारी (दि. २६) केंब्रिज शाळेतील काही श्रीमंत पालकांनी प्रशासनाधिकाऱ्यांकडे केली. शिक्षणहक्कतील प्रवेश बेकायदेशीर झाला असून, त्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे या पालकांनी लेखी दिले. 
 
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. ेंब्रिज शाळेने गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागेवर श्रीमंतांच्या पाल्यांना प्रवेश दिल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणाची चौकशी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती. या चौकशीत दोन वर्षांत शंभरहून अधिक प्रवेश संशयास्पद असल्याचे अाढळून अाल्याने या विद्यार्थ्यांसंदर्भात केंब्रिज शाळेकडून खुलासा मागितला आहे. मात्र, या शाळेकडून आतापर्यंत केवळ दहा ते पंधरा पालकांचीच माहिती देण्यात आली असून हे पालकही श्रीमंत अाहेत. केंब्रिज शाळेत शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून हवे तसे कडक पाऊल उचलले जात नाही. शाळेवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. शाळा पालकांना म्हणते की, आम्ही शिक्षण विभागाला बघून घेऊ आणि शिक्षण विभागही या बाबीकडे गांभीर्याने बघत नाही. यामुळे एकूणच शिक्षण विभागाची भूमिका संशयास्पद वाटत असून, शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा शुक्रवारी (दि. २६) आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी जितेंद्र भावे, जसबिर सिंग, विनायक येवले, एकनाथ सावळे, प्रमोदिनी चव्हाण उपस्थित होते. 

अद्याप कारवाई का नाही? 
^आधीच शाळेला अल्पसंख्याक दर्जा असतानाही त्यांनी शिक्षणहक्कचा लाभ घेतला. तसेच बोगस प्रवेशही दिले. शाळेविरोधात पालक बोलायला तयार असताना चाैकशीत शाळा दोषी आढळली असताना कारवाई करण्याएेवजी प्रशासनाधिकारी ‘ऑफर’ची वाट बघताय की का? -जितेंद्र भावे, आम आदमी पार्टी 

शाळेतून दाखले काढणार 
केंब्रिज शाळेत नियमित प्रवेशप्रक्रियेत प्रवेश घेतलेले असताना शाळेने शिक्षणहक्कत प्रवेश करून घेतल्याने शासनासह पालकांचीही फसवणूक केल्याने या प्रकरणातील काही पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेतच ठेवायचा नसल्याचा पवित्र घेतला आहे. शिक्षणहक्कातून बेकायदा प्रवेश करण्यात आलेल्यांपैकी काही पालक शनिवारी (दि. २६) आपल्या पाल्यांचे दाखलेच शाळेतून काढणार असल्याची भूमिका घेतली आहे. 

कारवाई होणारच.. 
^केंब्रिज शाळेकडून शिक्षणहक्क अंतर्गत झालेल्या प्रवेश घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भातील सर्व माहिती प्रशासनाधिकाऱ्यांकडून घेतली जाईल. तसेच शाळा दोषी आढळल्यास कारवाई होणारच. -रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक 

 
बातम्या आणखी आहेत...