आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजार अतिक्रमण निर्मूलनावरील ८३ लाखांचा खर्च पालिका करणार वसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  शहरातील सर्वात माेठी अतिक्रमण हटाव कारवाई ठरलेल्या चुंचाळे शिवारातील अनधिकृत भंगार बाजार काढण्यापाेटी झालेला ८३ लाख रुपयांचा खर्च वसुलीची प्रक्रिया सुरू झाली अाहे. ज्यांनी अनधिकृत बांधकाम वा अतिक्रमण केले, त्यांच्याकडून संबंधित जागेचा नव्याने वापर करण्याबाबत नगररचना विभागात प्रस्ताव अाल्यावर त्यावर प्रति चाैरस फूट ४३ रुपये प्रति चौरस फूट याप्रमाणे दंडात्मक शुल्क आकारले जाणार अाहे. 
 
दिलीप दातीर यांनी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करीत चुंचाळे शिवारात अंबड लिंकरोडवरील अनधिकृतरित्या वसलेल्या भंगार बाजारावर हाताेडा फिरवण्यास भाग पाडले हाेते. तब्बल एक लाख ९६ हजार ८०० चौ. मीटर क्षेत्रावर वसलेला भंगार बाजार काढण्यासाठी महापालिकेने नाेटीस बजावल्यानंतरही व्यापाऱ्यांनी दाद दिली नव्हती. अखेरीस पालिकेने ते १० जानेवारीदरम्यान, पाेलिसांच्या सहकार्याने माेहीम उघडत जुन्या ५२३ नव्याने उभारण्यात आलेल्या २४० असे एकूण ७६३ अनधिकृत शेड उद‌्ध्वस्त केला. या माेहिमेसाठी बांधकाम विभागाचे १२ पोकलेन, ३० जेसीबी, ४८ डम्पर, २६ ट्रॅक्टर तसेच गॅसकटरचा वापर करण्यात आला. तर १७ पोलिस निरीक्षक, ५८ पोलिस उपनिरीक्षक, ४४० पोलिस कर्मचारी, ६४ शिपाई, तसेच ट्रॅकिंग फोर्सचे ३३ जवान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात हाेते. या माेहीमेचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले. मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर १२ लाख ३५ हजार ०१६, बांधकाम विभागातील साहित्यावर १५ लाख ४४ हजार १६०, पोलिसांवर २३ लाख ६७ हजार १३२ रूपये तर विधी इतर खर्चापाेटी ३१ लाख ४३ हजार ०८० असे जवळपास ८२ लाख ८९ हजार ३८८ रुपयांचा पालिकेचा खर्च झाला. दरम्यान, अशा माेहिमेवरील खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्याचा नियम लक्षात घेता, त्याबाबत कारवाई सुरू झाली अाहे. भंगार बाजार ज्या जागेवर अाहे तेथील जागा संबंधित व्यावसायिकांच्या अाहेत. यातील अनेक जागा रहिवासी अाहेत. जागेच्या गैरवापराचा मुद्दा असल्यामुळे कारवाई झाली असून, अाता ज्या प्रयाेजनासाठी राखीव जागा अाहे त्यानुसार उपयाेगासाठी हालचाली सुरू झाल्या अाहेत. या पार्श्वभूमीवर भंगार बाजार कारवाईत ज्या जागामालकांवर कारवाई झाली त्यांना नवीन प्रयाेजनासाठी प्रस्ताव मंजूर करताना क्षेत्रानुसार ४३ रुपये प्रति चाैरस फूट याप्रमाणे शुल्क भरावे लागणार अाहे. तसे अादेश दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...