आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

746 भंगार दुकानांवर शनिवारपासून हाताेडा, महापालिकेचे अधिकारी अाज करणार पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंबड लिंकराेडवरील चुंचाळे शिवारातील भंगार बाजार हटवण्याची कारवाई शनिवार (दि. ७)पासून सुरू हाेणार असून, ती अाठवडाभर चालणार अाहे. त्यासाठी महापालिका पाेलिसांची तयारी पूर्ण झाली अाहे. गुरुवारी (दि. ५) महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून पथकांची जबाबदारी ठरवतील. 
 
७४६ भंगार दुकाने हटवण्यासाठी साडेसातशे पाेलिस, तर महापालिकेचे दीडशे अधिकारी कर्मचारी राहणार असून, शुक्रवारी पाेलिस दल या भागात संचलन करणार अाहे. गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित भंगार बाजाराचा विषय महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मार्गी लावण्याचे मनावर घेतले अाहे. न्यायालयाने यापूर्वीच भंगार बाजार हटवण्याचे अादेश दिल्यामुळे, तसेच स्क्रॅप मर्चंट्स असाेसिएशनची याचिकाही फेटाळल्यामुळे महापालिकेचा हुरूप वाढला अाहे. त्यातच पाेलिस अायुक्त रवींद्र सिंघल यांनीही काेणत्याही परिस्थितीत भंगार बाजार हटवण्यासाठी पुरेसा बंदाेबस्त पुरवण्याची भूमिका घेतल्यामुळे कारवाईची निश्चिती झाली अाहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजेपासून बाजार हटविण्याची कारवाई सुरू होणार असून, शुक्रवारी (दि. ६) पोलिस भंगार बाजारात संचलन करणार अाहेत. भंगार बाजारातील साहित्य शक्य तितके महापालिका उचलून नेणार असून, जे साहित्य शिल्लक राहील ते वापरायाेग्य राहणार नाही, याची तजवीज करून नष्ट केले जाणार अाहे. 

अशी हाेणार कारवाई 
भंगार बाजाराचे सहा भाग करून प्रत्येक विभागात सात जणांचा उपगट केला जाईल. जेसीबी, २४ डम्पर, ट्रॅक्टर, पाेकलॅन या माेहिमेसाठी वापरले जातील. या ठिकाणी वीज पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी वायरमन, प्लंबर, फायर ब्रिगेड कर्मचारी वाहन साहित्यासह तैनात असतील. शनिवारी माेहीम सुरू झाल्यावर ती साधारणपणे अाठवडाभर चालेल, असे सूत्रांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...