आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरविण्यासाठी नको, तर स्वत:ला जिंकण्यासाठी स्पर्धा करा : डाॅ. चांदेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - प्रत्येकाने स्वतःला जिंकण्यासाठी स्पर्धा करावी. आपण दुसऱ्याला हरविण्यासाठी स्पर्धा करतो. त्यामुळे स्वत: जिंकण्यासाठी स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज असून त्यासाठी चिंतन आणि आत्मविश्वास असायला हवा. यशामध्ये मेहनत, प्रयत्न आणि गुरूंचा सहभाग असून, पदवीदान समारंभ तुमच्या प्रवासाचा शेवट नसून प्रारंभ असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. चांदेकर यांनी केले. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठा विद्या प्रसारक समाजतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित द्वितीय पदवीदान समारंभ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. व्यासपीठावर संचालक मुरलीधर पाटील, भाऊसाहेब खातळे सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. संत ज्ञानेश्वरांना प्रतिकूल परिस्थिती लाभली होती.
 
त्यांना संन्यासाची मुले म्हणून हिणवले जात होते. पण त्यातही ज्ञानदेवांनी आपले मोठे बंधू निवृत्तिनाथांना गुरू केले. त्यांच्या सांगण्यानुसार गीतेचे बोलीभाषेत रूपांतर करून ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला, अाध्यात्मिक समता आणली.
 
 तुम्हीही चांगली गुणवत्ता प्राप्त करा अाणि आयुष्यभरासाठी ध्येय शोधा, असे अावाहन पवार यांनी केले. स्वागत, प्रास्ताविक प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी केला. यावेळी विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ताप्राप्त मविप्र संस्थेच्या १७ महाविद्यालयांच्या स्नातकांना डॉ. चांदेकर यांचे हस्ते पदवीदान करण्यात आली. या कार्यक्रमास मिरवणुकीने प्रारंभ झाला. त्याचे संचलन परीक्षा विभागप्रमुख डॉ. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुरेश जाधव, तर आभार दिंडोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरेंनी मानले. राष्ट्रीय छात्रसेना आणि नौदलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 
 
अापली भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीन असून, आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरा अनादी काळापासून चालत आली आहे. यामध्ये गुरूने शिष्याचा सन्मान करायचा, गुरूंच्या सांगण्याप्रमाणे शिष्याने श्रम करायचे, त्या श्रमाचे मूल्यमापन म्हणजे पदवीदान होय. आजदेखील ती परंपरा कुलगुरूंच्या माध्यमातून सुरू अाहे अाणि यापुढील काळातदेखील ती कायम राहील, असे प्रतिपादन याप्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. एम. जी. चांदेकर यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...