आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिलाही व्हायचंय मुलगा; दरवर्षी शंभराहून अधिक व्यक्ती करतात लिंगबदल शस्त्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बीडमधील पोलिस कर्मचाऱ्याच्या लिंग बदलामुळे हा विषय सध्या चर्चेत आहे. पुरुषाच्या शरीरात स्त्रीचे मन किंवा स्त्रिच्या शरीरात पुरुषाचे मन अशा काही व्यक्ती असू शकतात. याला शास्त्रीय भाषेत जेंडर आयडेंटीटी डीसऑर्डर म्हणतात. अशा व्यक्तींना योग्य उपचारांचा उपयोग होतो. त्यास जेंडर री-असाईंगमेंट शस्त्रक्रिया म्हणतात. गेल्या  दहा वर्षांत दरवर्षी अशा शंभरहून जास्त शस्त्रक्रिया झाल्याचे सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. अशा अनुभवतातून गेलेल्या नाशिकमध्ये राहाणाऱ्या अमृतला वाटते की, आपल्याला जे भोगावे लागले ते अशा अन्य मुलामुलींच्या वाट्याला येऊ नये, त्यांना अधार व योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांची फसवणूक आणि कुचंबणा होऊ नये त्यांच्यासाठी संस्था स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

 

 

मेल टू फिमेल : मुलींची लक्षणे दिसू लागताच त्यांचा समावेश तृतींयपंथी समाजात करण्याचे प्रमाण लक्षणीय

> आताच फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो देशभरातील साडेचारशे मुलामुलींशी संपर्कात आहे. त्यात बहुतांश ‘एफटीएम’ म्हणजे ‘फिमेल टू मेल’ आहेत. त्या तुलनेत ‘एमटूएफ’ म्हणजे ‘मेल टू फिमेल’ कमी आहेत. ‘मुलगा म्हणून जन्माला आलेल्या परंतु स्त्री हार्मोन्स असलेल्या, स्त्री बनू पाहणाऱ्या एमटूएफच्या शस्त्रक्रिया सोप्या आहेत. पण, त्या फार खुलेपणाने दिसत नाहीत. मुख्य म्हणजे मुलीची लक्षणे दिसू लागताच त्यांचा समावेश तृतीयपंथी समाजात होतो. त्यांना गुरू मिळतात, तेच शस्त्रक्रिया करतात आणि त्या तृतीयपंथी म्हणूनच जगायला लागतात. पण आम्ही तृतीयपंथी नाही. आमची नोंद ‘एम’ – मेल - म्हणून व्हावी, ‘टी’ - ट्रान्सजेंडर - म्हणून नाही, अशी आमची मागणी  असल्याचे अमृतने सांगितले.    

 

> असाच अनुभव आलेला  दर्पण (नाव बदलले अाहे) ने सांगितले, ‘मी खूप प्रयत्न केला, पण आमच्या घरात हा विषय काढूच दिला जात नाही. बीडची बातमी लागली की, आईबाबा लगेचच चॅनल बदलतात’, केसांचा बॉयकट, पायात फ्लोटर्स, अंगात चेक्सचा शर्ट आणि जीन्स घातलेला. चेहऱ्यावरचं मुलगीपण लपत नाही आणि आत दडपून ठेवलेले पुरुषपण स्वस्थ जगू देत नव्हते. ‘सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो तो डॉक्युमेंटसचा. शैक्षणिक प्रमाणपत्रांवर मुलगी म्हणून नाव आहे आणि आता लिंगबदलानंतर माझे नाव वेगळे आहे. माझा बिझनेस आहे म्हणून ठीक, जे नोकरीत आहेत त्यांची कामाच्या ठिकाणी हँरेसमेंट होतेच.’  अमृत  सांगतो, मी पण अनेक वर्षे या घुसमटीत घालविली. पण जेव्हा मला माझी खरी ओळख मिळाली तेव्हाचे समाधान आणि आत्मविश्वास वेगळाच होता.’  

 

> मीनाची (नाव बदलले आहे) कथा वेगळी आहे. तिला अमृतप्रमाणे लिंग बदलाबाबतची माहिती आणि साथ मिळाली नाही. नाशिकच्या उपनगरात राहणारी मीना आधी मुलगा होती. ‘मला कळायला लागले तेव्हापासून मुलींसारखे नटावे, नाचावे वाटायचे. घरी कुणी नसताना मी मुलींचे कपडे घालायचो. एकदा घरच्यांना कळाले. त्यांनी खूप मारले. घरी वाद व्हायचा. आई म्हणाली, असे मूल माझ्या पोटी जन्मले नसते तरी चालले असते. त्यादिवशी मी तिरमिरीत घर सोडले. गाव सोडले. दोन रात्र रस्त्यावरच राहिलो. स्टेशनवर गुरुबंधू भेटले. त्यांनी गुरुंकडे नेले. त्यांनीच दीक्षा दिली आणि मला माझी वेगळी ओळखही. कदाचित, या शस्त्रक्रियेबद्दल माहीत असते, कुटुंबानं साथ दिली असती तर आजही माझी ओळख कदाचित, हिजडा म्हणून नव्हे तर बाई म्हणून असती.

 

समाजाची साथ हवी
‘आमच्या फक्त एवढ्याच अपेक्षा आहेत. सर्वात पहिली मागणी समाजातील पालकांकडून. त्यांनी अशा वेगळ्या मुलांना स्वीकारावे, त्यांना त्यांची खरी ओळख व्यक्त करण्याची संधी द्यावी, समाजाने त्यांना त्या वेगळ्या ओळखीसह स्वीकारावे,’ या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. यात कुटुंबाची साथ मिळाली की बाकीची लढाई सोपी होते हा अनुभवही त्यांनी सांगितला. लिंगबदलाच्या या प्रक्रियेत स्वत:च्या कुटुंबासह मित्रमैत्रिणी आणि मुंबईतील सायन हॉस्पिटलच्या डॉक्टर्सची खूप मोलाची मदत झाल्याचे ते आवर्जून सांगतात.  

 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, अशी होते लिंगबदल प्रक्रिया...

बातम्या आणखी आहेत...