आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोंदेतील ‘शालिमार पेंट्स’ला भीषण आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घोटी / इगतपुरी / नाशिक - गोंदे दुमाला (ता. इगतपुरी) येथील औद्योगिक वसाहतीतील रंगनिर्मिती करणाऱ्या शालिमार पेंट्स कारखान्याला शनिवारी (दि. १९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीच्या मुख्य प्लांटनेच पेट घेतला असून, तेथे मोठ्या प्रमाणात रसायने असल्याने लगतच्या गोंदे गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने डोंगरावर हलविण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. खबरदारी म्हणून मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूकही एक तास रोखण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी याच कारखान्यातील याच प्लांटला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
दरम्यान, याच ठिकाणी रंगनिर्मितीसाठी असणारे रसायने मोठ्या प्रमाणात असून, त्यांनी पेट घेतला तर मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून लगतचे कारखाने बंद करण्यात आले अाहेत. आगीनंतर सुमारे एक तास मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान १० बंबांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत होते. नाशिक मुख्यालयातून बंब घटनास्थळी पाठविण्यात आले होते. इगतपुरी नगरपालिका, महिंद्रा कंपनी, टोल प्लाझाचेही बंब आग विझविण्याचे प्रयत्न करत होते.
बातम्या आणखी आहेत...