आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुजन सामर्थ्याचे अतिविराट दर्शन, न्याय्य मागण्यांसाठीलाेटला जनसागर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरातील प्रत्येक रस्ते जणू केवळ अन् केवळ गाेल्फ क्लबकडेच वाहत हाेते. सकाळपासून सायंकाळपर्यंत महानगरातील प्रत्येक रस्ता गर्दीने अाेसंडून वाहत हाेता. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी खांद्यावर निळे झेंडे मिरवत एकत्र अालेला अथांग निळ्या सागरासारखा हा जनसमुदाय हाेता. मात्र, तरीही निळ्या रंगाच्या या वादळाची शांततादेखील अनेक शब्दांहून अधिक बाेलकी हाेती. विविध मागण्यांचे केवळ फलक झळकावत निघालेल्या या महामाेर्चाने माैनातही असलेल्या सामर्थ्याचा पुन:प्रत्यय दिला.
शेकडाेंच्या संख्येने सकाळपासून असलेले स्वयंसेवक अाणि सकाळी १० पासूनच जिल्हाभरातून नाशिककडे मार्गस्थ झालेले नागरिक जमा हाेऊ लागले. त्यामुळे ११ वाजेपासूनच उत्साही कार्यकर्ते गाेल्फ क्लबवर गाेळा हाेऊ लागले हाेते. ११.३० वाजेपर्यंत ईदगाह मैदान अर्धे भरले हाेते. ते दुपारी १२ च्या सुमारास अाेसंडून वाहू लागले. तरीदेखील मैदानाच्या चहुबाजूने शेकडाे नागरिकांचे जत्थे दाखल हाेणे सुरूच हाेते. १२.३० च्या सुमारास ईदगाह मैदानाच्या बाहेरील दाेन्ही बाजूचे रस्ते प्रचंड गर्दीने अाेसंडून वाहत हाेते. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी माेर्चाला प्रारंभ झाला.

फलकांवरझळकल्या मागण्या : माेर्चातसहभागी नागरिकांनी काेणत्याही घाेषणा देऊ नये, असे निर्धारित असल्याने सर्व मागण्या फलकांद्वारेच मांडण्यात अालेल्या हाेत्या. त्यात प्रामुख्याने अॅट्रॉसिटीची कठाेर अंमलबजावणी करा, अादिवासींना वनजमिनी द्या, दलित कार्यकर्त्यांवरील खाेटे गुन्हे मागे घ्या, तळेगाव घटनेची सीबीअाय चाैकशी करा, नांदूर नाका घटनेतील बलात्कारी सचिन पाटीलला फाशी द्या, बलात्काऱ्यांना फाशी द्या, महात्मा फुलेंना भारतरत्न द्या यांसह अन्य अनेक मागण्यांचा त्यात अंतर्भाव हाेता.

पुन्हाबसवली घडी : महामाेर्चालाईदगाह मैदानावरून प्रारंभ हाेऊन ताे गडकरी चाैकाकडे मार्गस्थ झाला. मात्र, ताेपर्यंत सारडा सर्कल, मुंबई नाका तसेच चांडक सर्कलकडून गर्दीचे लाेंढे येतच हाेते. ते दाखल हाेत असतानाच माेर्चा निघालेला दिसल्यानेअनेक जण दिसेल त्या जागी घुसल्याने नियाेजन काहीसे विस्कटून क्रम चुकला हाेता. मात्र, स्वयंसेवक अाणि कार्यकर्त्यांनी शिंगाडा तलावच्या फायर ब्रिगेड स्टेशनपाशी पुन्हा फेरनियाेजन करीत निर्धारित क्रमानुसारच मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.
डाॅ.अांबेडकर यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन : माेर्चास्थळीडाॅ. अांबेडकर यांचे ग्रंथ तसेच त्यांच्या जीवनकार्यावर थोर विचारवंत अभ्यासकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात अाले हाेते. मोर्चातइतर धर्मीयांचाही सहभाग : ‘बहुजनमहामोर्चा’मध्ये दलित बांधवांसह एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी हाेते. काही शीख बांधवांनी तर चक्क निळे कपडे घालून मोर्चात हजेरी लावली. मुस्लिम समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत काही तरुण मोर्चात उपस्थित झाले होते. आेबीसी बांधव पिवळे झेंडे घेऊन सामील झाले होते.
पंचवटीभागातून सर्वाधिक सहभाग : पंचवटी,आडगाव, पेठरोड, दिंडोरीरोड भागातील नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने मोर्चा स्थान गाठले. तपोवन, डोंगरे वसतिगृह येथे वाहने थांबवत ज्येष्ठ नागरिकांसह महिला, लहान मुले पायी येत असल्याने रस्त्यांवर सर्वत्र निळे झेंडे निदर्शनास येत होते. आडगावमधून सुमारे दीड हजार नागरिक, पेठरोड परिसरातून दहा हजार नागरिक या मोर्चात सहभागी झाले. यासह दिंडोरी, वणी, कळवण, सटाणा, मालेगाव, रावळगाव, ओझर, निफाड, लासलगाव, येवला या मोठ्या तालुक्यांच्या गावांतून सुमारे वीस हजार नागरिक मोर्चात सहभागी झाले.

पुरी-भाजीचीव्यवस्था : महामोर्चाचेआयोजक शेखर निकम यांनी माेर्चेकऱ्यांसाठी पुरी-भाजीची व्यवस्था केली हाेती. जिल्हा रुग्णालयासमोरील स्टॉलवर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी पुरी-भाजीचा अास्वाद घेतला. विविध ठिकाणी पाणीवाटप करण्यात येत होते. रस्त्यावरील कचरा स्वयंसेवकांकडून तत्काळ उचलला जात होता.

एसटी महामंडळातर्फे १०० बस
बहुजन समाजाच्या महामोर्चातील माेर्चेकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसाठी १०० बस उपलब्ध करून दिल्या हाेत्या. या महामोर्चामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ज्या बसस्थानकातून मागणी होईल त्या ठिकाणांहून जादा बस सोडण्याच्या सूचना एसटी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.

पायी रॅलीने माेर्चात सहभाग
माेर्चाचा प्रारंभ गाेल्फ क्लब मैदानापासून करण्यात येणार असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी माेर्चास्थळी येण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर केला. सातपूर, मिलिंदनगर, संत कबीरनगर, पंचवटीतील म्हसरूळ, दिंडाेरी नाका, अाडगाव नाका, नाशिकराेड, व्दारका परिसरातून
माेर्चास्थळी पायी येणेच नागरिकांनी पसंत केले.

अचूक नियाेजन ठरले प्रभावी
बहुजन महामाेर्चाच्या यशस्वितेसाठी बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गावाेगावी केलेली जनजागृती चांगलीच प्रभावी ठरली. त्यामुळेच या महामाेर्चाला लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला हाेता. विशेष म्हणजे, या महामाेर्चात प्रथमच बहुजन समाजातील विविध जाती-जमातीचे लाेकदेखील सहभागी झाले हाेते.
असा हाेता महामाेर्चाचा क्रम
हजाराे नागरिक मैदानाच्या दाेन्ही गेटकडून अात येत असतानाच माेर्चाला प्रारंभ करण्यात अाला. माेर्चाच्या अग्रभागी असलेला संविधानाचे शिल्पकार तथा महामानव डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचा भव्य चित्ररथ, त्यापाठाेपाठ भन्तेजींचा जत्था, त्यानंतर वकील, मग महिला अाणि पुरुष असा हा क्रम हाेता. त्याबाबत ईदगाह मैदानावरील स्टेजवरून सातत्याने घाेषणा केल्या जात हाेत्या.
बातम्या आणखी आहेत...