आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्यापूर्वी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा अाज माेर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दसऱ्या पूर्वी कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने साेमवारी (दि. ११) शालिमारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 4 वाजता धडक माेर्चा काढण्यात येणार अाहे. शिवसेना कार्यालयात झालेल्या पदाधिकारी लाेकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. 
 
यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घाेषणा करून तीन महिन्याचा कालावधी उलटला अाहे. अद्याप शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. केवळ अाकड्याचे खेळ करून अाणि तारखांवर तारखा देणे सुरू अाहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कधी मिळेल असा सवाल करीत शिवसेनेने अांदाेलन केले. जिल्हा बँकेसमाेर ढाेल बजाव अांदाेलन केले. जिल्हा बॅंकेसमाेर ढाेल बजाव अांदाेलन करून सरकार अाणि बॅंकांनीही जाब विचारला. अाता तिसऱ्या टप्प्यात दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी साेमवारी शालिमार चाैक येथून माेर्चा काढण्यात येणार अाहे. यावेळी जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, महिला अाघाडीच्या सत्यभामा गाडेकर, शामला दीक्षित, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, दीपक दातरी अादी उपस्थित हाेते. 
बातम्या आणखी आहेत...