आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी स्टेडियमचा उपयाेग केवळ क्रीडा उपक्रमांसाठीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एम.जी. राेडवरील वाहतूक काेंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेवर वाहनांचे पार्किंग करण्याबाबतचा प्रस्ताव म्हणजे ‘अाग रामेश्वरी अाणि बंब साेमेश्वरी’ असा प्रकार असल्याचा सूर क्रीडा संघटनांनी व्यक्त केला अाहे. तसेच, या जागेचा वापर हा केवळ क्रीडा कारणासाठीच करावा, असा उच्च न्यायालयाचा अादेश असल्याने त्याच्या वापर कारणात बदल करणे हा ‘कंटेम्प्ट अाॅफ काेर्ट’ अर्थात कायद्याने गुन्हा ठरणार असल्याचे मतही क्रीडा संघटनांनी व्यक्त केले अाहे. 
 
एम. जी. राेडच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये पार्किंगची पुरेशी सुविधाच उपलब्ध नसल्याने ही समस्या निर्माण झाली अाहे. दुकानदार अाणि त्यांच्याकडे येणारे ग्राहक यांच्याकडून फूटपाथ अाणि रस्त्यापर्यंत केले जाणारे वाहनांचे पार्किंग हेच समस्येचे मूळ कारण अाहे. त्यात या पदपथांवर उभे राहणारे फळविक्रेेते, लहान-माेठे विक्रेते यांनी या समस्येत भर घातली असल्यामुळेच एम. जी. राेडवरील वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला अाहे. या समस्या दूर करण्यासाठी नियम माेडणाऱ्यांना वठणीवर अाणण्याएेवजी मैदानाची जागा बळकावण्याचा डाव सफल हाेऊ दिला जाणार नसल्याचा इशाराही क्रीडा संघटनांनी दिला अाहे. 

...अन्यथा संघटना अांदाेलनाच्या पवित्र्यात : महानगरविस्तारत असताना शिवाजी स्टेडियमचे एकमेव क्रीडांगण मध्यवर्ती स्थानी असून, त्याचा उपयाेग अासपासच्या परीघातील शाळांचे सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी करतात. दरराेज या मैदानावर येऊन विविध खेळांचा सराव करणाऱ्या मुलांची संख्या ५०० हून अधिक अाहे. जिथे भविष्यातील राज्य अाणि राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडू शकतात, असे महानगरातील मध्यवर्ती जागेवरचे हे एकमेव भव्य मैदान असून, त्याचा गळा दाबला जाऊ नये, असे क्रीडा संघटनांच्या वतीने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात अाले अाहे.
 
मैदानाची जागा बळकावण्याचा प्रयास केल्यास सर्व मार्गांनी प्रत्युत्तर देण्याचा इरादा क्रीडा संघटकांनी जाहीर केला अाहे. त्यात जिल्हा कबड्डी असाेसिएशन, जिल्हा खाे - खाे असाेसिएशन, जिल्हा फुटबाॅल असाेसिएशन, जिल्हा व्हाॅलीबाॅल असाेसिएशन, जिल्हा तिरंदाजी असाेसिएशनसह अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश अाहे. 

संबंधित काॅम्प्लेक्समधील दुकानदारांनी त्यांची वाहने त्यांच्यासाठी निर्धारित जागांवरच पार्क करावीत. अन्यथा, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील पार्किंगमध्ये लावली तर ग्राहकांच्या वाहनांसाठी त्या काॅम्प्लेक्समधील थाेडी तरी जागा मिळू शकेल. पदपथावरील सर्व विक्रेते, स्टाॅलधारकांना त्वरित हटवावे अाणि पार्किंगची जागा साेडून पदपथांवर गाडी पार्क केल्यास ती वाहने त्वरित टाेइंग करून नेल्यास वचक बसून अापसूकच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत हाेऊ शकणार असल्याचे मत क्रीडा संघटनांनी व्यक्त केले अाहे. 

प्रस्ताव क्रीडा संकुल समितीसमाेर ठेवणार 
- वाहतूक शाखेकडूनमैदानावरील काही भाग पार्किंगसाठी देण्याचा प्रस्ताव अालेला अाहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय क्रीडा संकुल समितीसमाेर ठेवूनच घेतला जाणार अाहे.
संजयसबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी 
बातम्या आणखी आहेत...