आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा एबी फाॅर्मचा गोंधळ, दहा ठिकाणी उमेदवारीबाबत संभ्रम, 3 पर्यंतच एबी फाॅर्म बंधनकारक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बंडखाेरी टाळण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी यादी अखेरपर्यंत जाहीरच केली नाही, त्यामुळे प्रचंड गाेंधळाचा सामना पदाधिकारी, उमेदवार, इच्छुक अाणि कार्यकर्त्यांना करावा लागला. एबी फाॅर्म वेळेत जमा करता अाल्यामुळे जवळपास अाठ ते दहा इच्छुकांच्या उमेदवारीबाबतच संभ्रम निर्माण झाला अाहे.
 
तज्ज्ञांच्या मते संबंधितांना पक्षाच्या वतीने उमेदवारी करताच येणार नाही. पक्ष मात्र अापले १२२ उमेदवार निश्चित असल्याचा दावा करीत पक्षनेत्यांचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्यामुळे काेणाची उमेदवारी नाकारली जाण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, असे म्हटले अाहे. 
 
भाजपशी स्पर्धेच्या नादात अति सावध भूमिका घेत सेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी जाहीर केली नाही. त्यातच एबी फाॅर्म वाटपाची व्यवस्थाही एकहाती लावण्यात अाल्याने एेनवेळी फाॅर्म वाटप करताना माेठाच गाेंधळ उडाला.
 
त्यातून अनेकांना उशिरा फॉर्म हाती लागले, तर काहींच्या हाती फाॅर्म हाती लागलेच नाहीत. दुपारी नंतर एबी फाॅर्म देणाऱ्यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळू शकत नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. 
 
प्रत्यक्षात पर्यंत एबी फाॅर्म जमा केलेल्या उमेदवारांची संख्या अाठ ते दहा किंवा त्यापेक्षा अधिकही असण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे पक्षानेे अर्ज भरणाऱ्यांनी एबी फाॅर्म वेळेत सादर केला नसेल तर त्यांचा अर्ज बाद हाेणार अाहे. त्यामुळे सेनेचे असे इच्छुक उमेदवारीतूनच बाद हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. 
 
महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी मात्र १२२ उमेदवारांची यादी सायंकाळी जाहीर केली. अाम्ही एबी फाॅर्म सर्वांनाच दिले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात हे फाॅर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत पाेहोचलेच नाही.
 
दरम्यान, प्रभाग क्रमांक मधील सेनेच्या इच्छुकांना मिळालेले एबी फाॅर्म तिकीट नाकारलेल्या एका इच्छुकाने चक्क फाडून टाकले. त्यामुळे या चाैघांची उमेदवारी धाेक्यात अाली अाहे. एकीकडे एबी फाॅर्मचा गाेंधळ सुरू असताना, दुसरीकडे तिकीट मिळाल्याने संबंधित इच्छुकांनी पक्ष कार्यालयात अन्यत्र जाेरदार नाराजी व्यक्त केली.
 
तिकिटे विकल्याचा अाराेप : प्रभाग क्रमांक 2 मधून सेनेच्या वतीने विश्वास तांबे यांनी त्यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली हाेती. मात्र, एेनवेळेला ती नाकारली.
 
उमेदवारीसाठी अापल्याकडून पैशाची मागणी केल्याचा अाराेप तांबे यांनी केला अाहे. पक्षाबद्दल मला अादर असून, काही पदाधिकारी मात्र तिकिटांचा बाजार मांडत असल्याचा अाराेपही तांबे यांनी लिखित स्वरूपात केला अाहे. 
 
- निवडणूक अायाेगाच्या कार्यक्रमानुसार फेब्रुवारीस दुपारी पर्यंत एबी फाॅर्म स्वीकारणे बंधनकारक अाहे. त्यामुळे त्यानंतर अालेल्या अर्जाचा विचार हाेऊ शकत नाही. 
-विजय पगार, उपायुक्त, महापालिका 
 
काँग्रेस उमेदवाराच्या हाॅटेलमधून सेनेचे फाॅर्म वाटप 
शिवसेनेचेएबी फाॅर्म वाटपाचे काम अखेर एसएसके हाॅटेलमध्ये करण्यात अाले. हे हाॅटेल काँग्रेसचे प्रभाग क्रमांक १२ चे उमेदवार शैलेश कुटे यांच्या मालकीचे अाहे. मात्र, या हाॅटेलमधून चक्क शिवसेनेचे एबी फाॅर्म वाटप सुरू हाेते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अाश्चर्य व्यक्त करण्यात अाले. 
 
अभूतपूर्व गोंधळ 
सिडकाेतील प्रभाग २८ २९ मध्ये सेनेच्या वतीने तब्बल अाठ इच्छुकांना एबी फाॅर्मचे वाटप झाले. त्यामुळे नक्की उमेदवारी काेणाला हे पक्षातील नेतेही सांगू शकत नव्हते. दुसरीकडे प्रभाग क्रमांक १२ मध्ये मधुकर देवरे कुणाल भाेसले या दाेघांचे नाव उमेदवारी यादीत अाहे. यापैकी एकाला ए, तर दुसऱ्याला बी फाॅर्म देण्यात अाल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. त्यामुळे या भागातील उमेदवार काेण, याबाबतही संभ्रम अाहे. 
 
स्थळ बदलूनही गाेंधळ 
उमेदवारांना एबी फाॅर्मचे वाटप प्रारंभी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात सुरू हाेते. तेथे गाेंधळ सुरू झाल्यावर जीपीअाे परिसरातील कार्यालयात त्यानंतर उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात एबी फाॅर्मचे वाटप करण्यात अाले. सगळीकडे गाेंधळ हाेत असल्याचे बघून अखेर चांडक सर्कल येथील एसएसके हाॅटेलमध्ये फाॅर्मचे वाटप करण्यात अाले. मात्र, तेथेही कमालीचा गाेंधळ झाला.
बातम्या आणखी आहेत...