आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना-भाजप संघर्षात भंगार बाजार कारवाई अडकणार, कारवाईस ब्रेकची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड लिंकराेडवरील अनधिकृत भंगार बाजारात गुरुवारी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली. - Divya Marathi
अंबड लिंकराेडवरील अनधिकृत भंगार बाजारात गुरुवारी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली.
नाशिक - सतरा वर्षांपासून चर्चेत असलेल्या भंगारबाजार हटवण्यासाठी शनिवारचा मुहूर्त निश्चित झाला असताना किंबहुना संपूर्ण तयारीही पूर्ण झाली असताना शिवसेना भाजपतील अंतर्गत संघर्षात कारवाईला ब्रेक लागण्याची भीती निर्माण झाली अाहे. महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर भंगारबाजार काढल्यास त्याचे श्रेय शिवसेनेला जाण्याची भीती असून, त्यातून भाजपकडून भंगारबाजारावरील कारवाई थांबवण्यासाठी महापालिका पाेलिस यंत्रणेवर दबाव टाकला जात असल्याचे वृत्त अाहे. दाेन्ही पक्षांच्या फायद्या-ताेट्याच्या गणितात भंगारबाजारावरील कारवाई थांबली तर शहरातील एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा धगधगताच राहण्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण हाेणार अाहे. 
 
अंबड-सातपूर लिंकराेडवरील भंगारबाजाराचा मुद्दा अनेक वर्षांपासून वादात असून, उच्च न्यायालयाने भंगारबाजार हटवण्यासाठी यापूर्वीच अादेश दिले अाहेत. भंगारबाजार हटवण्यासाठी सर्व पाठपुरावा शिवसेनेचे दिलीप दातीर यांनी केला असून, न्यायालयीन लढाईही त्यांच्याच केंद्रस्थानी राहिली हाेती. भंगारबाजाराचा दातीर यांचा पाठपुरावा अनेक दिवसांचा असला तरी, त्यात शिवसेना पहिल्यापासून कधीच सक्रिय नव्हती. मात्र, पालिका निवडणुकीच्या ताेंडावर भंगारबाजार हटवल्यास त्याचा सेनेला फायदा हाेईल या विचारातून पुढे सहभाग वाढत गेला. अायुक्तपदी कृष्णा हे रुजू झाल्यावर त्यांनी सर्वच महत्त्वाचे प्रश्न साेडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यापूर्वीचे अायुक्त गेडाम यांनी भंगारबाजाराचा मुद्दा फारसा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे कृष्णा यांची कार्यपद्धती बघून शिवसेनेने अाक्रमक पवित्रा घेतला. शहरातील प्रमुख प्रश्नांपैकी एक असल्यामुळे कृष्णा यांनी भंगारबाजार हटवण्यासाठी जाेरदार प्रयत्न सुरू केले. पाेलिस अायुक्त रवींद्र सिंघल यांनीही गुन्हेगारीचे केंद्रस्थान असल्यामुळे भंगारबाजारासाठी पाेलिस बंदाेबस्त पाहिजे त्यावेळी देण्याची भूमिका घेतली. त्याचा परिणाम म्हणून दाेन्ही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून शनिवारी भंगारबाजारावर हाताेडा पडणे नक्की झाले अाहे. भंगारबाजार हटला तर अापसूकच त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेकडून पुढाकार घेतला जाणे स्वाभाविक अाहे. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुकीत शंभर प्लसचा नारा देणाऱ्या भाजपची अडचण वाढणार अाहे. त्यातून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा अाहे. खासकरून महापालिकेवर अधिक दबाव असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यामुळे अाता महापालिका अायुक्त दबावाखाली कारवाई थांबवतात की दबाव झुगारून भंगारबाजारावर हाताेडा पडताे हे बघणे महत्त्वाचे झाले अाहे. यासंदर्भात भाजपचे अामदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध हाेऊ शकले नाही. त्यामुळे भाजपतून नेमका काेणाचा दबाव याबाबत स्पष्ट हाेऊ शकलेले नाही. 

...तर शिवसेना रस्त्यावर उतरेल 
- भंगार बाजारहटवू नये असा अायुक्तांवर भाजपच्या अामदारांचा दबाव अाहे. अायुक्तांवर असा दबाव टाकल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल. -अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना 
भाजप अामदारांचा दबाव नाही 

 - पालिका प्रशासनानेभंगार बाजार हटविण्याची कारवाई नियमानुसार करावी. ही कारवाई हाेऊ नये असा भाजपच्या अामदारांचा दबाव प्रशासनावर नाही.
-बाळासाहेब सानप, अामदार, भाजप 
भाजपच्या अामदारांचा दबाव 

- भंगार बाजारहटवू नये असा दबाव भाजपचे अामदार महापालिका प्रशासनावर टाकत अाहेत. मात्र प्रशासनाने काेणताही दबाव स्वीकारता ही कारवाई करावी. -दिलीप दातीर, शिवसेना 
सातपूर-
बातम्या आणखी आहेत...