आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा पालिकेच्या नथीतून शिवसेनेच्या हाेर्डिंग्जवर वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर अाता शिवसेना भाजपातील शीतयुद्ध चांगलेच पराकाेटीला जात असल्याचे चित्र असून महापालिकेच्या नथीतून भाजपचे नगरसेवक शिवसेनेवर वार करीत असल्याची तक्रार शिक्षण मंडळ उपसभापती गणेश चव्हाण यांनी केली अाहे. चव्हाण यांचे म्हसरूळ भागातील हाेर्डिंग्ज घंटागाडीबाबत गीताद्वारे जागृती करणारी गाडी महापालिकेने चक्क निवडणूक प्रचाराचे कारण देत बंद केल्यामुळे त्यांनी अाक्रमक पवित्रा घेत भाजपाच्या इशाऱ्यावरून कारवाई झाल्याचा अाराेप केला अाहे. दरम्यान, विभागीय अधिकारी ए.पी. वाघ यांनी सर्वच पक्षाचे हाेर्डिंग्ज हटवले जात असल्याचा दावा केला अाहे. 
 
उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार शहरात एकही अनाधिकृत हाेर्डिंग अाढळले तर थेट संबंधितावर गुन्हे दाखल करणे अपेक्षित अाहे. पालिकेने सुरुवातीला काही हाेर्डिंगबहाद्दरांवर गुन्हे दाखल केले, मात्र काही काळानंतर ही माेहीम सुस्तावली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनाधिकृत हाेर्डिंग युद्ध सुरू झाले. गल्लीतील भाई-दादा, भाऊ-काका हे पुन्हा हाेर्डिंगवर अवतरले अाहेत. मात्र, महापालिका सर्व दिसत असूनही चुप्पच अाहे. गुन्हा दाखल करण्याचा तर जणू विसरच पडला अाहे. दरम्यान, शिवसेनेत अालेले मनसे नगरसेवक गणेश चव्हाण यांचे साेमवारी म्हसरूळ भागातील हाेर्डिंग पालिकेने काढून घेतले. हाेर्डिंग काढून घेतल्याबद्दल तक्रार नसली तरी, शेजारीच असलेले भाजपशी संबंधित इच्छुकांचे हाेर्डिंग्ज दिमाखात झळकत असल्यामुळे चव्हाण यांनी विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. एवढेच नव्हे तर, घंटागाडीबाबत जनजागृती करणारे गीत वाजवत फिरणारी गाडीही थांबवली गेली असून महापालिका निवडणुकीचा प्रचार हाेत असल्याचा दावा करण्यात अाला अाहे. त्यामुळे सरसकट सर्वांचेच हाेर्डिंग्ज काढावे, अशी मागणी चव्हाण यांनी अायुक्तांकडे केली अाहे. 

सूडबुद्धीने कारवाई 
^भाजपनगर सेवकांच्या सांगण्यावरून फक्त शिवसेनेचेच हाेर्डिंग्ज काढले जात अाहेत. घंटागाडीचे प्रबाेधन करणारे गीतही थांबवण्यात अाले. पालिकेकडून पक्षपाती कारवाई अपेक्षित नाही. -गणेश चव्हाण, उपसभापती,शिक्षण समिती 

सर्वांवरच कारवाई 
^शिवसेनेचेच हाेर्डिंग्जकाढले जात असल्याचा अाराेप चुकीचा अाहे. सर्वांवरच कारवाई होते. -ए. पी. वाघ, विभागीय अधिकारी 

 
बातम्या आणखी आहेत...