आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकाेत अखेर शिवसेनेच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा, शिवसेनेच्या पक्षनेतृत्वालाच अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीत सिडकाे विभागातील प्रभाग २८ अाणि २९ मध्ये शिवसेनेच्याच चार अधिकृत उमेदवारांसह अाणखी काही इच्छुकांनाही एबी फाॅर्म वितरित झाल्याने नेमके अधिकृत उमेदवार काेण? असा पेच निर्माण झाला असता, दाेन दिवसांच्या छाननी प्रक्रियेत अखेर तिघा विद्यमान नगरसेवकांचा अर्ज वैध ठरला. तर, मनसेतून शिवसेनेत अालेल्या विद्यमान नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांच्यासह माजी नगरसेवक सतीश खैरनार यांचा पत्ता कट झाला. 
 
या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर अाला असून, या दाेघांच्या जागेवर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक अाणि भूषण देवरे या दाेघांचे अर्ज वैध ठरविण्यात अाले अाहे. उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. शनिवारी सकाळी छाननी सुरू झाली. सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा निकाल अपेक्षित असताना कायदेशीर बाबी तपासल्या जात हाेत्या. 
 
यामध्ये प्रभाग २८ मध्ये विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह नगरसेविका शीतल भामरे, सुवर्णा मटाले यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे, रेणुका गायधनी, सोनाली काकडे यांनाही एबी फाॅमचे वितरण करण्यात अाले हाेते. त्यामुळे या सहाही उमेदवारांच्या अर्जात नेमके पक्षाचे काेणते अधिकृत, असा पेच निर्माण झाला हाेता. 
 
यापाठाेपाठ प्रभाग २९ मध्येही नगरसेवक अरविंद शेळके माजी नगरसेवक सतीश खैरनार, नगरसेविका रत्नमाला राणे, सुमन सोनवणे, दीपक बडगुजर, भूषण देवरे अशा सहा उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण करण्यात अाले. 
 
या सर्वच उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जावर अाक्षेप घेतल्याने छाननीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. यामध्ये रात्री डी. जी. सूर्यवंशी, भामरे अाणि मटाले यांचे अर्ज वैध ठरविण्यात आल्याने त्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. तर, रविवारी निकाल राखून ठेवलेल्या प्रभाग २९ मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानीं नगरसेविका रत्मनाला राणे, सुमन साेनवणे अाणि बडगुजर, देवरे या चाैघांचे अर्ज वैध ठरवित शेळके खैरनार यांचे अर्ज बाद केले.
 
 या निकालाने विद्यमान पाच नगरसेवकांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष पक्षांतर्गत गटबाजीचा शेळके खैरनार यांना फटका बसल्याचे बाेलले जात अाहे. यामध्ये छाननी प्रक्रियेत सर्वच उमेदवारांनी वकिलांच्या वतीने बाजू मांडली. यात, वेळेत एबी फाॅर्म भरण्याचा अाणि ताे अचूक असल्याचे बघण्यात अाले. 
 
चव्हाण आज बाजू मांडणार 
प्रभाग३० मधून शिवसेनेचे संजय चव्हाण, नीलेश चव्हाण, रशिदा शेख आणि शकुंतला खोडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी अर्जाबरोबर झेरॉक्स एबी फॉर्म जोडल्याने अ, अाणि या गटातील सेना उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. संजय चव्हाण यांनी अॅड. अाेढेकर यांना पाचारण केले. त्यांच्या मागणीवरून बाजू मांडण्यासाठी साेमवारी (दि. ६) सकाळी ११ पर्यंत मुदत देण्यात आली. 
 
जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने वाटप 
-जिल्हा प्रमुखांसाेबत बैठक झाली असून, त्यात निश्चित झाल्याप्रमाणे एबी फॉर्म दिले गेले. मात्र, दोन-दोन फॉर्म कुणी दिले माहीत नाही. अपेक्षित निकाल मिळाल्याने समाधानी आहोत. -सुधाकर बडगुजर, नगरसेवक 
 
अपेक्षित निकाल आणि आतषबाजी 
सेनेच्या प्रभाग २८ २९ मध्ये चुरशीच्या लढाईत अपेक्षित निकाल आल्याने उमेदवारांनी आतषबाजी करीत आनंदाचा जल्लोष साजरा केला. सेनेचे दीपक बडगुजर भूषण देवरे यांनी शक्तिप्रदर्शन केले. मात्र, सेनेच्या अंतर्गत गटबाजीला उधाण आल्याने यापुढील काळात सेनेपुढे बंडखोरांचे आव्हान असणार आहे. 
 
शिवसेनेने अधिकृत उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत विद्यमान नगरसेवकांचा समावेश असताना त्यांच्याएेवजी इतर इच्छुक उमेदवारांनाच एबी फाॅर्म वेळेअाधीच मिळाले अाणि या इच्छुकांनी अापणच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत नगरसेवकांच्या अर्जावरच अाक्षेप घेतला.
 
 या प्रकारावरून मूळ अर्ज अाणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सचिव अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीने उमेदवार निश्चित झाले असताना प्रत्यक्षात इतर इच्छुकांकडे एबी फाॅर्म कुठून अाले? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. एकीकडे शिस्तीचा अाणि अादेशावर चालणारा पक्ष म्हणून अाेळख असणाऱ्या शिवसेनेत उमेदवारी वाटपावरून महानगरप्रमुखावर पक्षातीलच इच्छुकांकडून हाेणारा हल्ला अाणि त्यापाठाेपाठ हा एबी फाॅर्म पळविण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली अाहे.
 
 या प्रकाराने शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र सिडकाे प्रभागात दिसत असून, याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता अाहे. या सर्वच प्रकाराची पक्षाने दखल घेतली असून, सचिव अनिल देसाई हे तातडीने रविवारी रात्री नाशकात दाखल झाले असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे समजते. 
बातम्या आणखी आहेत...