आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील घरभेद्यांवर कारवाई हाेणारच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात शिवसेनेसाठी अतिशय पाेषक वातावरण असतानाही पक्षाला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले अाहे. पक्षाची अशी अवस्था करणाऱ्या घरभेद्यांचा संपूर्ण अहवाल अाता तयार असून, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही; त्यांच्यावर कारवाई निश्चितच केली जाईल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चाैधरी यांनी नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिले. 
 
शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. ५) अायाेजित करण्यात अाला हाेता. शिवसेनेशी प्रतारणा करणाऱ्या भुजबळांपासून राणेंपर्यंतच्या नेत्यांचे काय हाल हाेतात हे सर्वांनी पाहिलेच अाहे, असे सांगत चाैधरी म्हणाले की, १९ जागांवरून ३५ जागांवर मजल मारणे ही बाब सेनेच्या यशाची पावती अाहे. परंतु, शहरातील वातावरण बघता शिवसेनेला बहुमत मिळणे अपेक्षित हाेते. त्या दृष्टीनेच पालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करीत अाम्ही निवडणूक लढलाे. मात्र, पक्षातील काही घटकांमुळे अपेक्षित यश संपादन करता अाले नाही. त्याचा अहवाल मी तयार केला अाहेच. शिस्तीला मानणारा हा पक्ष असल्याने गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. संबंधित दाेषींवर निश्चितपणे कारवाई ही हाेणारच. ज्यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले त्यांना कार्यकारिणीत सामावून घेण्याची ग्वाही चाैधरी यांनी दिली. 

नाशिकमध्ये पारदर्शकतेसाठी सेना अाक्रमक : मुंबईतपारदर्शकतेच्या मुद्यावर भाजपने सेनेशी युती ताेडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. त्यानंतरही पारदर्शकतेवर कायम राहात सेनेला काेंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात अाहे. त्याचा वचपा नाशिकमध्ये भाजपच्या सत्ताकाळात काढण्याचे संकेत चाैधरी यांनी दिली. अामचे ३५ नगरसेवक पारदर्शकतेच्या मुद्यावरच नाशिकच्या सभागृहात अाक्रमक राहतील असे त्यांनी भाषणात स्पष्ट केले. 

शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामाेर्तब 
महापालिकेच्या गटनेतेपदी विलास शिंदे यांची नियुक्ती व्हावी असा ठराव यावेळी महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी मांडला. त्यास डी. जी. सूर्यवंशी यांनी अनुमाेदन दिले. त्यामुळे अाता गटनेतेपदी शिंदे हेच काम करणार असल्याचे स्पष्ट झाले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...