आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थातील अडथळे; पुढचे हाेणार शहाणे, भविष्यात मार्गदर्शक पुस्तिका करणार तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बारा वर्षांनी हाेणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी निर्विघ्नपणे पार पाडण्याचे शिवधनुष्य प्रशासनाने उचलले असले तरी नियाेजनात अालेल्या अडचणी वा अडथळ्यांचा विभागनिहाय अहवाल तयार करून पुस्तिकेद्वारे कशा पद्धतीने मात केली, याचा एक अाराखडाच भविष्यात कार्यरत असलेल्या प्रशासनासमाेर ठेवला जाणार अाहे. त्यासाठी विभागीय अायुक्तांनी पुढाकार घेत प्रामुख्याने महापालिका जिल्हा प्रशासनाकडून माहिती गाेळा करणे सुरू केले अाहे. 
 
सिंहस्थ कुंभमेळ्याचा उत्सव गेल्या दाेन तपापासून चर्चेचा विषय ठरला. प्रामुख्याने गत कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे गालबाेट लागले हाेते. त्यामुळे २०१५-१६ मधील कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्याचे प्रमुख अाव्हान यंत्रणेपुढे हाेते. त्यात यंदा ५० लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता लक्षात घेत शहरात त्यांना व्यवस्थित सामावून घेणे सर्व सुविधा देण्याची कसरत करावी लागणार हाेती. भाविकांपेक्षा प्रमुख मुद्दा साधू-संतांचा सन्मान करणे त्यांना अावश्यक सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनावर हाेती. विभागीय अायुक्त, महापालिका जिल्हाधिकाऱ्यांनी सुयाेग्य नियाेजनाद्वारे सिंहस्थ यशस्वी केला.
 
 मात्र, अाता बारा वर्षांनी हाेणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शक हाेईल असा कार्यअहवाल बनवण्याचे काम विभागीय अायुक्तांनी मनावर घेतले अाहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय कुंभमेळ्याशी संबंधित सर्वच यंत्रणांची बैठक झाली.
 
या बैठकीत प्रामुख्याने काेणती कामे केली, कामे करताना अालेल्या अडचणी, व्यवस्थित काम हाेण्यासाठी केलेले नियाेजन याबाबत प्रत्येकाकडून अहवाल मागवला जाणार अाहे. प्रामुख्याने त्यात अडचणी कशा काेणत्या अाल्या याबाबत फाेकस असून, अडचणीवर मात कशी केली, याचा उल्लेख करून भविष्यातील अधिकाऱ्यांना अडचणी त्यावर मात करण्याचे उपाय अायतेच उपलब्ध करून दिले जाणार अाहेत.
 
या अडचणींबाबत प्रकर्षाने चर्चा 
सिंहस्थात साधुग्रामची जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा अखेरपर्यंत गाजला. कायमस्वरूपी जागा ताब्यात घेणे अखेरपर्यंत शक्य झाले नाही. राेख माेबदला टीडीअारचे सुयाेग्य धाेरण नसल्यामुळे भाड्याने जागा घेण्याची उपाययाेजना. सीसीटीव्ही कॅमेरेही भाड्याने घ्यावे लागले हाेते. सिंहस्थात गाेदावरीवर घाट बांधताना अनेक अडचणी अाल्या. साधू-संतांच्या मिरवणुकीचा शाही मार्ग अन्य अालेल्या अडचणींबाबत पुस्तिकेत विस्तृतपणे ऊहापाेह हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...