आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा चढल्याने पक्षी, प्राण्यांचीही लाही-लाही; फोटोंमधून पाहा कसे होतात हाल, तुम्हीही करा मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडाेरी परिसरात वनविभागाला उष्माघाताने मुर्च्छित पडलेला फ्लेमिंगाे अाढळून अाला. संबंधित कर्मचाऱ्यांनी पक्षीमित्र अभिजित महाले व त्यांच्या टीमकडून उपचार करून घेतले. - Divya Marathi
दिंडाेरी परिसरात वनविभागाला उष्माघाताने मुर्च्छित पडलेला फ्लेमिंगाे अाढळून अाला. संबंधित कर्मचाऱ्यांनी पक्षीमित्र अभिजित महाले व त्यांच्या टीमकडून उपचार करून घेतले.
नाशिक - तपमानाचा पारा ४० अंशावर गेल्यानंतर सर्वाधिक त्रास मुक्या प्राण्यांना बसत अाहे. बऱ्याचशा प्राण्यांना विशेषत: कुत्र्यांना मानवाप्रमाणे ‘डी हायड्रेशन’चा त्रास सहन करावा लागत अाहे. पाळीव कुत्र्यांवर उपचारासाठी सध्या डाॅक्टरांकडे गर्दी हाेत अाहे. मात्र भटक्या अनेक भटक्या कुत्र्यांना मात्र जीव गमवावा लागला अाहे. पक्षांचेही हाल कमी नाही. उन्हाच्या तडाख्याने ठिकठिकाणी पक्षीही मुर्छीत हाेऊन पडत अाहेत.

उन्हाच्या तडाख्याने नाशिककर हवालदिल झाले अाहेत. म्हणूनच दुपारच्या वेळी बाहेर पडणे जाणीवपुर्वक टाळले जात अाहे.  परिणामत: रस्त्यांवर शुकशुकाट दिसताे. वातानुकूलीत यंत्रणा, पंखे, थंड पेय अादी सर्व माध्यमातून शरीराला थंडावा मिळण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु अाहेत. प्राणी अाणि पक्षांचे मात्र या काळात कमालीचे हाल हाेत अाहेत. भटके कुत्रे, गायी, शेळ्या यांच्यासह पक्षांना उन्हाचा माेठाच त्रास हाेत अाहे. दुपारच्या वेळी तर काही प्राणी 
अाणि पक्षी मुर्च्छित हाेऊन मृत्यूमुखी पडत असल्याचे ठिकठिकाणी दिसत अाहेत. 
 
पाळीव प्राण्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. त्यातच कुत्रे, मांजरी अाणि काही पक्षांना घराबाहेर ठेवले जात असल्याने या पक्षांना उन्हाचा जाेरदार तडाखा बसून ते अाजारी पडत अाहेत. दिवसभर भरपूर खेळणारे श्वान किंवा मांजर दिवसभर कोपऱ्यात शांत पडून राहते. त्यांचे केस गळतात. आडोशाला जाऊन बसलेले पक्षी बोलावले तरी पटकन समोर येत नाहीत. आत्यंतिक नाजूक जातीच्या माशांचा मत्स्यपेटीतील अचानक मृत्यू हा केवळ तापमानात विचित्र बदल झाल्यानेही होतो. बदलत्या ऋतूप्रमाणे प्राण्यांच्या वागणुकीतील बदल हा साहजिक असला, तरी काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक असते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडे अाजारी कुत्री, मांजरी अाणि पक्षांना घेऊन येणाऱ्यांची गर्दी हाेत अाहे.
 
यंदा प्रमाण वाढले 
दुपारी एक ते चार वाजेदरम्यान उन्हाची तीव्रता प्रचंड असते. त्यामुळे अशा काळात पक्ष्यांना उन्हाचा जास्त फटका बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उडताना अचानक चक्कर येऊन खाली पडणे, तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडतात.
 
पुढील स्लाईडवर वाचा, 
> डी-हायड्रेशनसह उन्हाळ्यातील आजारपणाची लक्षणे
> पक्ष्यांसाठी करा या सहजसोप्या उपाययोजना
> अशी घ्यावी काळजी
> पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि पक्षीमैत्रीण यांची प्रतिक्रिया
> पक्षी, प्राणी जखमी दिसल्यास साधा संपर्क... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...