आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरला 3 वर्षांच्या बालिकेवर चुलत मामाने केला अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर-  शहरातील गोंदेश्वर मंदिराजवळील भैरवनाथ नगरात राहणाऱ्या 3 वर्षीय बालिकेवर तिच्या चुलत मामाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. चॉकलेटचे अामिष दाखवून अमितकुमार हरेंद्रो महातो (२५, सध्या रा. भैरवनाथनगर, मूळ रा. भगवानपुरा, जिल्हा-सिमान, बिहार) याने हे दुष्कृत्य केले. 
 
दरम्यान मुलीस त्याने पुन्हा घरी आणून सोडल्यानंतर तिच्या गुप्तांगावर जखमा असल्याचे आईच्या निदर्शनास आले. तिने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सिन्नर पोलिसांत धाव घेऊन घटनेची माहिती दिली. महिला पोलिसांनी बालिकेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर रात्री उशिरा सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...