आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाेट्या स्पर्धांतून अभिनय क्षेत्रात मारा माेठी मजल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- छोट्या-छोट्या स्पर्धेतून अभिनय क्षेत्रात माेठी मजल मारू शकले. यश मिळाल्यावर आत्मविश्वास वाढत गेला. विवाहाच्या टप्प्यातील जबाबदारीमुळे कामात खंड पडला होता. पण, संसार स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा उभारी घेतली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता प्रभू यांनी केले. 
 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेने महिला दिनानिमित्त अायाेजित कार्यक्रमात त्या म्हणाल्या, ‘लग्न झाल्यावर सुरवातीला विरोध झाला, पण सकारात्मक विचारांनी तारून नेले. घर सांभाळून नाव कमावले.
 
सर्व भगिनींनाही मी घर सांभाळून नाव कमावण्याचा सल्ला देते.’ मनोज नागपुरे निर्मित ‘द सीड्स पेराल ते उगवेल’ हा लघुपट सादर करून त्यावर आधारित त्यातील अभिनेत्री स्मिता प्रभू नागपुरे यांच्याशी संवाद आयोजित केला होता. 
 
यावेळी नागपुरे म्हणाले की, संघर्षातून प्रयत्नाने अभिनयात नाव कमावले. अभिनय क्षेत्रात यश मिळविणे सोपे नसून, त्याला मेहनतीची जोड असावी लागते. मी जे काही आहे ते माझ्या पत्नीमुळेच. 
 
या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा न्यायाधीश प्रकाश कऱ्हाडकर, लघुपटातील अभिनेते राजा पत्की, सतीश गोरे जगन्नाथ निकम, अलका सिंग, सौ. नागपुरे, नयना देशमुख, विजयाताई देशमुख आदी उपस्थित होते. सुजाता हिंगे यांनी सूत्रसंचालन केले. कामिनी तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. अतिथींचा परिचय मानसी घमंडी यांनी करून दिला. सुदाम सातभाई यांनी आभार मानले. रेखा पाटील यांनी गायलेल्या पसायदानाने सांगता झाली. 
 
सुरेखा गणोरे, अाश्विनी दापोरकर, मंगला सातभाई, वासंती ठाकूर, वृंदा देशमुख, रवींद्र मालुंजकर, रमेश औटे, हर्षल भामरे, राहुल बोराडे, विश्वास गायधनी, जयंत गायधनी, शिवाजी म्हस्के, प्रदीप पाटील आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
 
यांना मिळाले पुरस्कार... 
यावेळी सामाजिक न्याय प्रबोधिनी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा महिला वकील पुरस्कार अॅड. सुरेखा जोशी यांना, तर ज्युनियर वकील पुरस्कार अॅड. दीपाली अहिरे यांना देण्यात आला. अॅड. पद्मा थोरात यांनी परिचय करून दिला. 
बातम्या आणखी आहेत...